Search
Close this search box.

Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आयपीएलच्या 2026 च्या सहाव्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 65 धावांनी पराभव झाला. केकेआरचा हा यंदाच्या आयपीएलमधील दुसरा पराभव ठरला. केकेआरचा पहिला सामना मुंबईविरोधात होता, त्या सामन्यात देखील केकेआरचा पराभव झाला होता. केकेआरचे सलग दोन पराभव झाले असले उपकर्णधार रिंकू सिंगनं एका विक्रमाची नोंद केली आहे. रिंकू सिंगनं आंद्रे रसेलचा एक विक्रम मोडला आहे.

रिंकू सिंगनं मोडला आंद्रे रसेलचा विक्रम

रिंकू सिंगनं हा विक्रम क्षेत्ररक्षणात केला आहे. रिंकू सिंगनं केकेआरसाठी आंद्रे रसेलपेक्षा अधिक कॅच घेण्याचा विक्रम केला आहे.  रिंकू सिंगनं ही कामगिरी केकेआरसाठी 61 वा सामना खेळताना केली आहे. रिंकू सिंगनं केकेआरसाठी आतापर्यंत 42 कॅच घेतले आहेत. तर, आंद्रे रसेलनं केकेआरसाठी  खेळताना 40 कॅच घेतले होते.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध केकेआरचा 65 धावांनी पराभव

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादनं 65 धावांनी विजय मिळवला. हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 226 धावा केल्या होत्या. सनरायजर्स हैदराबादकडून सर्वाधिक धावा हेनरिक क्लासेन यानं केल्या. क्लासेन 52 धावा करुन बाद झाला. त्याशिवाय अभिषेक शर्मानं 48 आणि ट्रेविस हेडनं 46 धावा केल्या.

कोलकाताचा संघ 161 धावांवर बाद

सनरायजर्स हैदराबादनं केकेआरला विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरनं चांगली सुरुवात केली होती. फिन एलन यानं पहिल्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली मात्र तो लगेच बाद झाला. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे 8 धावा करुन बाद झाला. कॅमेरुन ग्रीन आणि अंगकृष रघुवंशी दोघे धावबाद झाले. कॅमेरुन ग्रीन 2 धावांवर बाद झाला. तर, अंगकृष रघुवंशी हा 52 धावा करुन धावबाद झाला. रिंकू सिंग देखील 35 धावा करुन बाद झाला. यानंतर केकेआरचा संघ 16 ओव्हरमध्येच 161 धावांवर बाद झाला.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमधील केकेआरचा हा दुसरा पराभव ठरला. केकेआरला अगोदर मुंबई इंडियन्सनं पराभूत केलं होतं. तर, आता सनरायजर्स हैदराबादनं पराभूत केलं आहे. आता केकेआर या पराभवाच्या मालिकेला ब्रेक लावणार का ते पाहावं लागेल.

admin
Author: admin

और पढ़ें