Search
Close this search box.

Kolhapur Crime:आईच्या आजारपणाचा गैरफायदा, मुख्याध्यापकाने 16 वर्षीय तरुणीला फ्लॅटवर नेलं अन्…; कोल्हापुरातील संतापजनक घटना उघड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना कोल्हापुरात घडली आली आहे. एका आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

इयत्ता दहावीपर्यंत आश्रमशाळेत शिकलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना कागल तालुक्यात घडली आहे. संशयित मुख्याध्यापक कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय 55, रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगूड, ता. कागल) याने पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर दोन वेळा अत्याचार केले. जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी त्याला मुरगूड येथून अटक करून न्यायालयात हजर केले. विशेष न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, तपास पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडून सुरू आहे.

आईच्या आजारपणाला आधार म्हणून जवळीक साधली…

सोळा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेत इयत्ता दहावीपर्यंत शिकत होती. तिचे वडील वारले असून, आई, एक बहीण आणि फक्त तीच घरात राहतात. आई कोल्हापूर शहरात राहते आणि काही दिवसांपासून आजारी असल्याने मुलगी कोल्हापूरला परतली होती. याचा फायदा घेत संशयित दाभोळे याने आईच्या तब्येतीची विचारपूस करत विद्यार्थिनीशी पुन्हा संपर्क वाढवला. ऑगस्ट 2025 मध्ये पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने तिच्यावर अत्याचार केला. तर या मुख्याध्यापकाच्या मुलाचा कोल्हापुरात एक फ्लॅट आहे. दोन महिन्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये या मुलाच्या कोल्हापूर शहरातील फ्लॅटमध्ये विद्यार्थिनीला बोलावून पुन्हा हा प्रकार घडवला.

जुना राजवाडा पोलिसांच्या माहितीनुसार, दाभोळे हा आश्रमशाळेचा मुख्याध्यापक असून, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्याने उलट आपल्याच विद्यार्थिनीला वासनेची शिकार बनवले. अत्याचारादरम्यान त्याने पीडितेला कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, पालकांनी सखोल चौकशी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.

मुलीच्या वागणुकीत बदल पाहून तक्रार..

पीडितेच्या वागण्यात झालेला असामान्य बदल आईने लक्षात घेतला. विश्वासात घेऊन संवाद साधल्यावर मुलीने सर्व कथा सांगितली. यानंतर माय-लेकींनी पोलिस मुख्यालयातील महिला सहाय्यक कक्षात तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पीडितेचा जबाब नोंदवला आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Pocso कायद्यासह गुन्हे दाखल..

“संशयिताविरुद्ध बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंधक अधिनियम (Pocso Act) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मंगळवारी अटक करून न्यायालयात उभे केल्यानंतर तीन दिवसांची कोठडी मंजूर झाली. पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास सुरू असून, संशयिताच्या मुलाच्या फ्लॅटचीही पाहणी करण्यात आली आहे.” अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालक संघटनेने शाळा प्रशासनावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली असून, जिल्हा शिक्षण विभागानेही प्राथमिक तपास सुरू केला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार