Search
Close this search box.

बीड हादरले! पुन्हा संतोष देशमुख सारखे खळबळजनक प्रकरण; मारहाण झालेले शिवराज दिवटे आहे तरी कोण?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. बीड पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या घटनेमुळे पुन्हा एकदा हादरला आहे.  संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. जाणून घेऊया प्रकरण नेमकं काय आहे?

संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे कुख्यात झालेला बीड जिल्हा शुक्रवारी आणखी एका गुन्हेगारी घटनेमुळे हादरला. बीडच्या परळी इथल्या शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत काही तरुण शिवराज दिवटेला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी मारहाण करण्यात आली. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत. हे सगळेजण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला जोरात बडवताना दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही मारहाण करणारे त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मारहाण प्रकरणी परळी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

मारहाणीत जखमी शिवराज दिवटे याने सांगितली आपबीती

मी माझ्या मित्रांसोबत अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होतो. त्या ठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते. मला त्या संदर्भात माहिती नाही. परंतु त्यानंतर मी गावी परतत असताना आमच्या दुचाकी ला चार-पाच जणांनी अडवले आणि मला दुसऱ्या दुचाकी वर बसून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले.  त्या ठिकाणी मला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली.

मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत होते. काही लोक माझ्या मदतीला आले. मला त्यांच्या तावडीतून सोडवले नसता त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हणत शिवराज दिवटे याने घडलेला प्रसंग सांगितला.

दरम्यान आता जखमी असलेल्या शिवराज याची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी देखील घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून यावर ठोस पावले उचलत यातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 

admin
Author: admin

और पढ़ें