मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने (AEC) अतिशय मोठी कारवाई करत मुंबईतून उद्योजकाला मारण्यासाठीचा कट रचल्याच्या संशयावरून 5 संशयितांना अटक करणयात आली आले. मुंबईच्या अंधेरी इथं असणाऱ्या प्लॅटिनम हॉटेलजवळून या पाचजणांना पोलिसांनी अटक केली घेतलं. अधिकाऱ्यांनी हे पाचजण बिष्णोई टोळीतील असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर कारवाई केली.
मुंबईतील बिष्णोई टोळी पुन्हा एकदा कायद्याच्या अंमलबजावणीच्या रडारवर आली असल्याचं . मागील वर्षी राजकीय नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा या कुख्यात टोळीशी संबंध होता, त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने 25 हून अधिक जणांना अटक केली होती. तसंच अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर गोळीबाराच्या घटनेवेळीही या टोळीच्या कारवायांवर प्रकाश टाकण्यात आला होता. नामवंत उद्योपतीच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या माहितीनंतर गुप्तचर विभागानं याच माहितीवरून ही कारवाई केली. यावेळी अधिकाऱ्यांनी या पाचजणांकडून देशी बनावटीची पिस्तूलं, 21 जिवंत काडतुसं आणि दोन सिमकार्ड जप्त केले.
कारवाईचा घटनाक्रम
बड्या गुंडाच्या सूचनेवरून मुंबईतून एका व्यक्तीची हत्या करण्यासाठी आलेल्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने अटक केली. फेब्रुवारी 2025 मध्ये पोलिसांना गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार एका मोठ्या गुंडाच्या सांगण्यावरून मुंबईत एक टोळी सक्रीय झाल्याचं सांगण्यात आलं.
ही टोळी कोणाची तरी हत्या करण्यासाठी मुंबईत आलेली आहे असं समजताच गेल्या दोन गोळीबाराच्या घटना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या गोळीबाराच्या घटनांची गंभीर दखल घेऊन मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली आणि अधिकाऱ्यांनी चौकशीअंती योग्य कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून आरोपींचा शोध सुरू केला. ज्यानंतर 28 मार्च 2025 रोजी या टोळीतील एक सदस्य मुंबईतील अंधेरी येथील प्लॅटिनम हॉटेलमध्ये येणार असल्याचं कळलं. ज्या व्यक्तीची योजना आखत आहे त्याचा खून करून ते पुढे जाणार आहेत ही माहिती इथं उघड झाली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी एक पथक तयार करत हॉटेलच्या रुम क्रमांक 16 वर छापा टाकून पाच आरोपींना अटक केली. आरोपींकडून 7 पिस्तुलं, 21 राउंड गोळ्या, मोबाईल फोनचे डोंगल आणि सिमकार्ड सापडले. अटकेच्या या कारवाईनंतर या आरोपींवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची बाब लक्षात आली.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, हे लोक एका बड्या गुंडाच्या सांगण्यावरून मुंबईतील एका व्यक्तीचा खून करण्यासाठी आले होते. संपूर्ण घटना कशी घडवायची याची तयारी त्यांनी आधीच केली होती आणि त्या आधारे शस्त्रेही आणली होती.
घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं
1) विकाष दिनेष ठाकुर उर्फ विकी, वय 24 वर्ष
2) सुमीतकुमार मुकेषकुमार दिलावर, वय 26 वर्ष,
3) देवेंद्र रूपेष सक्सेना, वय 24 वर्ष,
4) श्रेयस सुरेष यादव, वय 27 वर्ष
5) विवेककुमार नागेंद्र सहा गुप्ता, वय 22 वर्ष
