Search
Close this search box.

Jalgaon Railway Accident: काळीज नाही दगड; सासूची बॉडी पाहून शोकाकूल सुनेला चोरट्यांनी लुटलं, जळगावात भयंकर घडलं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जळगाव रेल्वे दुर्घटना ही एका अफवेमुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या एका अफवेने १३ जणांचा जीव घेतला. लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याचं एक चहा विक्रेता म्हणाला आणि ही दुर्घटना घडली. गाडीतील एका डब्यात आग लागल्यानवे भीतीने प्रवाशांनी थेट रेल्वेतून उड्या घेतल्या. साळखी ओढून गाडी थांबवली आणि अनेक प्रवाशी आपला जीव वाचवण्यासाठी गाडीखाली उरतून इकडे तिकडे पळू लागले. तेवढ्यात दुसऱ्या रुळावरुन येणाऱ्या कर्नाटका एक्स्प्रेसने या प्रवाशांना धडक दिली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळीकडे आरडाओरड झाली, रेल्वेरुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह आणि रक्ताचा सडा पाहून साऱ्यांचाच थरकाप उडाला. अनेकांनी आपल्या प्रियजनांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला. यापैकीच एक होत्या कमला भंडारी. त्या मूळ नेपाळच्या असून मुंबईत मुलगा आणि सूनेसोबत राहत होत्या.

आगीची अफवा पसरताच कमला भंडारी यांनी आपल्या सूनेला याची सूचना दिली आणि इतर प्रवाशांच्या गर्दीत या दोघीही रेल्वेतून खाली उतरल्या. पण, यावेळी सून राधा भंडारी ही दुसऱ्या दारातून बाहेर आली तर कमला भंडारी या रेल्वे रुळाच्या बाजुने खाली उतरल्या. जेव्हा राधा भंडारी या आपल्या सासूला शोधू लागल्या तेव्हा त्यांना रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह दिसला. क्षणाभरापूर्वी दिसलेल्या सासूचा अचानक मृत्यू झाल्याचा धक्का राधा यांना बसला. त्यांनी कशीबशी हिम्मत जुळवली आणि त्या आपल्या सासूच्या मृतदेहाजवळ गेला, सासूला सावरत असताना काही दगडाच्या काळजाच्या चोरट्यांनी राधा यांचा मोबाईल आणि त्यांच्या पर्समधील पैसे चोरले.

जळगाव रेल्वे अपघातात नेपाळ येथील कमला नवीन भंडारी यांचा देखील मृत्यू झाला आहे. कमला भंडारी या मूळ येथील रहिवासी असून नेपाळ त्या मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. कमला भंडारी यांच्या सासर्‍यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या त्यांच्या सून राधा भंडारी यांच्यासोबत महिनाभरापूर्वी नेपाळ येथे गेल्या होत्या. नेपाळ येथून त्या लखनऊला आल्या. लखनऊ येथून पुष्पक एक्स्प्रेसने मुंबईला येत असताना प्रवासात दुर्दैवी घटना घडली.

त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मुंबईतून कमला भंडारी यांचा मुलगा तपेंद्र भंडारी हा जळगावचे जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. आम्ही नेपाळचे असल्याकारणाने आता मृतदेह कधी ताब्यात मिळणार कसा ताब्यात मिळणार, नेपाळला मृतदेह घेऊन पोहोचायचं कसं असे वेगवेगळे प्रश्न सध्या तपेंद्र भंडारी यांच्यापुढे आहेत.

कमला भंडारी यांचा मृतदेह घेऊन जाण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठल्याही सूचना मिळालेल्या नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात लवकरात लवकर सूचना द्याव्या असं सुद्धा त्यांनी म्हटले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें