Mahayuti Oath Ceremony: नव्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री कोण आहेत? महायुतीचे 35 नेते शपथ घेण्याची शक्यता, वाचा यादी
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबरला नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचं त्यांच्या कोट्यातील काही जागा रिक्त ठेवणार? का अशी चर्चा आहे. दरम्यान शिवसेना कोट्यातील सगळी मंत्रिपदं भरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीही पहिल्याच विस्तारात कोटा पूर्ण करणार हा हे पाहावं लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मंत्रिपद कायम राहावं, यासाठी वरिष्ठ नेते कसोशीनं प्रयत्न करत आहेत. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही पोहोचले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहेत भाजपाचे संभाव्य मंत्री?
1) चंद्रशेखर बावनकुळे
2) सुधीर मुनगंटीवार
3) राधाकृष्ण विखे पाटील
4) गिरीष महाजन
5) चंद्रकांत पाटील
6) रवींद्र चव्हाण
7) संभाजी पाटील
8) अतुल सावे
9) परिणय फुके
10) संजय कुटे
11) पंकजा मुंडे
12) मेघना बोर्डीकर
शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळू शकतो. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रीपदासाठी मिळणार आहे. शिवसेनेच्या या अडीच-अडीच वर्षाच्या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रीपदाची संधी मिळणार असून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधीक आमदारांना मंत्री पदाची संधी देणारा फॅार्मुला असणार आहे.
म्हणजेच, शिवसेनेला 10 मंत्रीपदे मिळत असतील तर या पाच वर्षांत 20 आमदारांना मंत्रीपदे मिळणार आहेत. सूत्रांनुसार, पहिल्या अडीच वर्षात मागील मंत्रिमंडळातील नेत्यांना डच्चू मिळू शकतो. तर, काही नवीन चेहरे समोर येऊ शकतात. त्यात संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, खोतकर आणि शिवतरे, यांच्या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून बाकीचे जुन्या मंत्रिमंडळातीलच मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे.