देश

RCB Playoffs: अजूनही ‘या’ समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?

गुरुवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. यावेळी फाफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या टीमने 35 रन्सने हैदराबादवर विजय मिळवला. मात्र आरसीबीच्या या विजयाचा पॉईंट्स टेबलवर फारसा फरक पडलेला नाही. दरम्यान या विजयामुळे रॉयल चॅलेंजर बंगळूरू प्लेऑफ गाठणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.

जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये. जाणून घेऊया आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीचं समीकरण कसं आहे.

आरसीबीला पाहिजे इतर टीम्सची मदत
आरसीबीला जर आता प्लेऑफ गाठायचं असेल तर सध्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या टीम्सने सर्व सामने जिंकावेत. त्यामुळे पॉईंट्स टेबलमच्या मध्यस्थानी असलेल्या टीम्सच्या अडचणींमध्ये वाढ होईल. सध्याच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या टीम्स प्लेऑफच्या जवळ आहेत. या टीम्सने आपले सामने जिंकत राहिले पाहिजेत.

यामध्ये जर राजस्थान टीमने उर्वरित 6 पैकी आणखी 4 सामने जिंकले तर त्यांचे पॉईंट्स वाढतील आणि या क्षणी टीम पहिल्या क्रमांकावर येईल. KKR आणि SRH संघांनी त्यांच्या उर्वरित सात सामन्यांपैकी 5 जिंकल्यास त्यांचे गुण 20 होतील. यामुळे पहिल्या तीन जागांसाठी प्लेऑफच्या टीम निश्चित होती. तर चौथ्या स्थानासाठी चुरस रंगेल.

आरसीबीला उर्वरित सामने जिंकावे लागतील
जर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमने उर्वरित सर्व सामने जिंकले तर त्याचे 14 गुण होतील. परंतु उर्वरित टीमचे जास्तीत जास्त 12 गुण होतील यावर देखील लक्ष ठेवावं लागलं. म्हणजेच चौथा संघ म्हणून आरसीबी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरेल. उर्वरित समीकरणं इतर टीमवर अवलंबून असतील. आरसीबी टीमला उर्वरित सर्व सामने आणि काही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. शिवाय यासोबत नेट रन रेट सुधारणंही गरजेचं आहे.

Related Articles

Back to top button