Search
Close this search box.

मुंबईकरांचे ₹3544 कोटी गेले कुठे? 8 महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतील रिझर्व्ह निधीत मोठी घट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अनेक देशांपेक्षाही मोठा वार्षिक अर्थसंकल्प असल्याने मुंबई महानगरपालिका केवळ देशात नाही तर आशियामध्येही प्रसिद्ध आहे. 70 ते 80 हजार कोटींहून अधिक मोठा वार्षिक अर्थसंकल्प असलेली देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्य जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) आर्थिक घरघर लागल्याचं चित्र दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीसंदर्भात चिंताजनक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या राखीव निधीत (रिझर्व्ह्ज) गेल्या आठ महिन्यांत तब्बल 3544 कोटी रुपयांची घट झाली आहे. ही आकडेवारी महापालिकेच्या तिमाही आर्थिक अहवालातून समोर आली आहे

पाच वर्षांत 13800 कोटी रुपयांची घट

महापालिकेच्या तिमाही आर्थिक अहवालानुसार, सध्या बीएमसीकडे फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपात 77,905 कोटी रुपये राखीव निधी आहे. फेब्रुवारीत सादर केलेल्या अर्थसंकल्पात हा आकडा 81449 कोटी रुपये होता. 2021 मध्ये हा निधी 91,670 कोटी रुपये होता. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत जवळपास 13800 कोटी रुपयांची घट झाली आहे.

नियमांनुसार राखीव निधीपैकी फक्त 50 टक्के रक्कमच…

मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बीएमसीकडून निधी वापरला जात आहे.  बीएमसीने विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 2.34 लाख कोटी रुपयांची जबाबदारी घेतली आहे. मात्र नियमांनुसार राखीव निधीपैकी फक्त 50 टक्के रक्कमच पायाभूत प्रकल्पांसाठी वापरता येते. उर्वरित रक्कम कर्मचारी पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि कंत्राटदारांच्या डिपॉझिटसाठी राखीव आहे.

लिक्विडिटीचे गंभीर संकट

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “सध्याच्या 77 हजार कोटी रुपयांपैकी फक्त 49 टक्के रक्कमच प्रकल्पांसाठी वापरता येईल. मात्र प्रकल्पांचा आकार या वापरण्यायोग्य रकमेपेक्षा जवळपास चार पट आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत बीएमसीला लिक्विडिटीचं गंभीर संकट भेडसावण्याची शक्यता आहे.” जर खर्च आणि दायित्वे नियंत्रित केली नाहीत तर हे संकट अटळ असल्याचं मानलं जात आहे. यावर्षी मालमत्ता कर आणि प्रीमियममधून उत्पन्न वाढल्यामुळे हे संकट लगेच येणार असून थोडं लांबणीवर पडल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र कमी होणाऱ्या या राखीव निधीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. एवढी घट झाल्यानंतर अजूनही मुंबई देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे पण मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे राखीव निधी सातत्याने घटत आहे. ही घट मुख्यतः खर्चामुळे आहे, उत्पन्न आटण्यामुळे नाही.

10 हजार कोटी उभारण्याची योजना 

मुंबई महानगरपालिका सध्या ग्रीन बाँड्सद्वारे किमान 10 हजार कोटी उभारण्याची योजना आखत आहे. सांडपाणी प्रक्रिया, डिसेलिनेशन प्लांट, पाणी टनेल, गर्गई धरण इत्यादी प्रकल्पांसाठी हा निधी उभारण्याची योजना आहे.

admin
Author: admin

और पढ़ें