अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पो-पिकपमध्ये भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 97 जवळ हा अपघात झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बुलेरो टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 21 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रेफर केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. समृद्धी महामार्गावर चॅनल 97 जवळची ही घटना असून शेगाववरून दुर्गा देवीची मूर्ती वर्धा येथे घेऊन जात असताना धामणगाव जवळ चॅनल 97 वर हा अपघात झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने जखमींना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, धामणगाव नगराध्यक्ष अर्चना रोठे रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णाची विचारपूस केली आहे. दरम्यान अपघाताच्या घटनेची संपूर्ण चौकशी सध्या पोलिस करीत आहे. अपघात नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस घेत आहे. मृत आणि जखमी हे वर्धा शहरातील सोमनाथे लेआउट, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.
19 जण गंभीर जखमी
अपघातात 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. 19 जणांपैकी तीन लोक मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या सावंगी हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगितली जात आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यास सुरुवात केली आहे.








