Search
Close this search box.

किल्ले रायगडकडे जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास होणार अधिक सुलभ; दादर येथे बससेवेचा शुभारंभ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दुर्गराज रायगड हे हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे तेजस्वी प्रतीक मानले जाते. मराठी माणसाच्या अस्मिता, स्वाभिमान आणि इतिहासाशी रायगडाचे अतूट नाते आहे. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासातील अनेक सुवर्णक्षणांचा साक्षीदार असलेला रायगड आजही लाखो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.

यंदा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, २७ जून २०२६ रोजी तिथीनुसार दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने रायगडावर दाखल होतात. त्यामुळे वाहतूक आणि प्रवासाच्या सुविधांना विशेष महत्त्व प्राप्त होते.

या पार्श्वभूमीवर शिवभक्तांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा या उद्देशाने श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि समितीचे सदस्य दीपेश पटवर्धन यांच्या पुढाकारातून मुंबई ते सांदोशी विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे रायगडावर जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या विशेष बससेवेचा शुभारंभ १ जून २०२६ रोजी दादर येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी, शिवभक्त आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईहून थेट सांदोशीपर्यंत सुरू करण्यात आलेल्या या बससेवेमुळे रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेता अशा उपक्रमांमुळे भाविकांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून दुर्गराज रायगडाशी जोडलेली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार आहे.

रायगडला नेमके कसे जाता येते?

रायगड जिल्ह्यातील येथून रायगड किल्ल्याचे अंतर साधारणपणे २६ किमी इतके असून महाड बस स्थानकावरून किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच ‘पाचाड’ गावत किंवा रोपवे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस तसेच खासगी वाहनाची सुविधा उपलब्ध आहे.

महाड आगारातून एसटी बस ही दररोज सकाळी ५:३० वाजल्यापासून पाचाड (रायगड पायथा) साठी स्थानिक बसेस सुटते. तिचे तिकीट दर साधारणपणे पन्नास ते साठ रुपये इतके आहे. जिजामाता यांची समाधी असलेल्या पाचाडवरून महाडसाठी शेवटची बस साधारण दुपारी ४:०० ते ५:०० च्या दरम्यान असल्याने रायगड गडावरून वेळेत येणे आवश्यक आहे. तसेच मुंबई येथून शिवभक्त हा खासगी वाहनाने गेल्यास आठशे ते हजार रुपये खर्च येत होता. मात्र या बससेवेमुळे आता वेळ आर्थिक बचत होणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें