Search
Close this search box.

Ahilyananagar Crime: ‘घराच्या बांधकामासाठी 4 लाख आण’ 2 वर्षे सासरच्यांनी छळले; 23 वर्षीय विवाहितेनं विहीर जवळ केली; अहिल्यानगर हादरले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. लैंगिक अत्याचार, मानसिक दबाव, हुंड्यासाठी छळ अशा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना समोर येत असताना  अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा दोन वर्ष सासरच्या लोकांनी छळ केला. शेवटी हा त्रास सहन न झाल्याने 23 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव संपवलाय. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल महिलेने उचलले. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Ahilyanangar Crime)

घराच्या बांधकामासाठी पैशाचा तगादा

प्रिया शुभम ढगे (वय 23) असे मृत विवाहितेचे नाव आहे. घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांची मागणी सासरकडून वारंवार करण्यात येत होती. या मागणीसाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. 2024 ते 2026 या कालावधीत हा छळ सुरू होता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या छळाला कंटाळून अखेर प्रियाने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेतली. या घटनेनंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.

या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे (सर्व राहणार को-हाळे, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर) यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

लेकानं जन्मदात्या वडिलांना संपवलं

काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मधून कौटुंबिक वादाने हिंसेच टोक गाठल्याची घटना घडलेली. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला. एक मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर चाकूचा वार करत हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरू करत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती .

admin
Author: admin

और पढ़ें