गेले काही दिवस महाराष्ट्र ामध्ये मराठीचा मुद्द्यावरुन चर्चा रंगते आहे. आता राज्यात रिक्षा आमि टॅक्सी चालकांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी भाषा बोलता यायला हवी असा स्वरुपाचा मुद्दा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणावरु सध्या राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळते आहे. येत्या १ मे पासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही या सर्व प्रकरणात एन्ट्री झाली आहे. मनसेने नेहमीच मराठीचा मुद्दा उचलून धरला होता त्यामुळे याप्रकणातही मनसे नेमकी काय भूमिक ठेवणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. त्याशिवाय आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी त्यांची पहिली भूमिका जाहिर केली आहे.
४ मे पासून संपावर
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेत बोलावं लागेल, मराठी बोलता, लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करणार असल्याचा इशारा प्रताप सरनाईकांनी दिला आहे. त्यामुळे मराठी भाषा सक्तीची या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात ४ मे पासून मुंबईतील 15 लाख रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यावरुन हे सर्व प्रकरण तापले आहे.
दरम्यान, यावर बोलताना मनेसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तुमची ताकद आम्हाला ४ मेला दाखवा, भैया लोकांना आता महाराष्ट्र आणि मुंबईमधून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे,” असं म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मराठी भाषा सक्तीची या सर्व प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. मुंबई, किंवा महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “पहिली गोष्ट म्हणजे मुंबई, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह होणं, मराठीला प्राथमिकता द्या असं सांगणं चुकीचं नाही. पण यावरुन कोणताही वाद होऊ नये ही सरकार म्हणूण आमची भूमिका आहे, तर ज्यांना टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकवू” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
संजय निरुपम यांचं म्हणणं काय?
दरम्यान, काल संजय निरुपम यांनीही या मुद्यावरु त्यांची प्रतिक्रिया दिली होती. “रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा केली पाहिजे. त्यांनी मराठीतून संवाद साधला पाहिजे. पण त्यांची परिक्षा घेऊ नका, कारण ते जास्त शिकलेले नाहीत. जास्त शिकलेले लोक रिक्षा, टॅक्सी चालवतील का? कॉर्पोरेटमध्ये काम करणारे रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का?. झोमॅटो, स्विगीवरुन पार्सल घेऊन येणारे मराठीत बोलतात का?” असे प्रश्न संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना विचारले.








