Search
Close this search box.

‘मी वहिनींना शब्द देते…’, सुप्रिया सुळेंची सुनेत्रा पवारांसमोर घोषणा; बारामतीच्या सभेत काय बोलल्या?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सांगता सभेला सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत, सुनेत्रा पवारांसाठी विक्रमी मतदान करत विजयी करण्याचं आवाहन केलं. तसंच महाविकास आघाडी सुनेत्रा पवारांनाच मतदान करेल असा शब्द दिला आहे. या संघर्षाच्या काळात संपूर्ण विकासामध्ये आपण सगळे एकत्र येऊन दादाला मनापासून श्रद्धांजली अर्पण करू असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.

‘दादा आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही’

“हा दिवस आपल्या आयुष्यात येईल असं कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं. मी पुण्याहून बारामतीला आल्यानंतर काठेवाडीला गेले होते, आशाकाकींना भेटले. त्या टीव्ही पाहत होत्या, त्यांच्याशी काय बोलावं, कशासाठी आले आहे हे सांगण्याची हिंमत झाली नाही. या सभेसाठी आल्याचं सांगू शकले नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी अडचणीचे राहिले आहेत. सांगता सभा करताना दादा आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. राज्यातील, जिल्ह्यातील काम असलं की आजही आठवण येते. कामं होत राहतात, पण आयुष्यभर घरातील कर्ता पुरुष, भाऊ नाही याचं दु:ख अंतकरणात आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘तिघे ज्याप्रकारे जबाबदारी पेलवत आहेत ती अभिमानाची बाब’

“या सभेसाठी राज्यातील अनेक मंत्री आले आहेत. माझं कर्तव्य आणि येथील लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. हा खूप दु:खाचा कार्यक्रम आहे. वहिनींवर, दोन्ही लेकरांवर मोठी जबाबदारी पडली आहे. पार्थ, जय लहानच आहेत. पण तिघे ज्याप्रकारे जबाबदारी पेलवत आहेत ती आपल्यासाठी अभिमानाची, कौतुकाची बाब आहे,” असं त्यांनी म्हटलं.

‘मी वहिनींना शब्द देते….’

“मी महाविकास आघाडीच्या वतीने सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सगळे सहकारी, पदाधिकारी यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की, महाविकास आघाडातील प्रत्येक कार्यकर्ता, बारामतीमधील मतदार वहिनींच्या पाठीशी निवडणुकीत ताकदीने उभा राहील,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

बारामती लवकरच एक रेकॉर्ड करणार 

पुढे त्यांनी म्हटलं की, “गेली सहा दशकं बारामतीकर आणि पवार कटुंबांचं वेगळं नातं आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीबाबत दिल्लीत काही चर्चा सुरु होती, त्यावेळी बारामतीचा विशेष उल्लेख झाला. बारामती लवकरच एक रेकॉर्ड करणार आहे. शरद पवारांना सहा दशकं याच बारामतीकरांनी साथ दिली. सर्वात जास्त वेळा निवडून येण्याचा मान बारामतीकरांना मिळणार आहे. 60 वर्ष ही परंपरा सुरु आहे. शरद पवार साहेब 6 दशकं येथे कार्यरत आहेत. त्यानंतर दादांवर मोठी जबाबदारी आली. त्यांनी निष्ठेने 35 वर्षं सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात स्थापित केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला. पण बारामतीकरांनी कधीच पवारांची साथ सोडली नाही. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना, काँग्रेस यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापपासून शब्द आणि शुभेच्छा देण्यास आले”.

हा दिवस आणि वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये

“माझी तर निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. म्हणून पहिल्या दिवशी बिनविरोध व्हावं असं सांगितलं. काहींचे फॉर्म शिल्लक आहेत हे दुर्देवी आहे. विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. 1 नंबरला वहिनींचं नाव चिन्ह, बटण आहे, ते दाबा. दादाला आदरांजली श्रद्धांजली द्या, वहिनीला साथ द्या. हा दिवस आणि वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये,” असं त्यांनी भावूक होत सांगितलं.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.