Search
Close this search box.

Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मराठा उपसमितीची काल मुंबईमध्ये काल महत्त्वाची बैठक पार पडली. शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, त्याद्वारे शिंदे समितीला हरवलेल्या 48 लाख कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे, गेल्या सहा महिन्यांमध्ये संभाजीनगर मध्ये 49 हजार प्रमाणपत्र बीड जिल्ह्यामध्ये 34 हजार पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र वितरित झाली असल्याची माहिती  त्यांनी दिली. यावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींना माझा सांगना आहे तुमचं आरक्षण संपल आहे. तुम्ही झोपा काढा. ओबीसीचा आरक्षण संपले आहे आणि शासन त्याला खत पाणी घालत आहे. राधाकृष्ण विखे पाटील सारख्या मुजोर मंत्र्याने ओबीसीचा आरक्षण संपवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असं म्हणत हल्लाबोल केला आहे.(Laxman Hake)

बारा लाख कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचं जाहीर केलं जात आहे. परत शिंदे समितीला मुदतवाढ दिली जात आहे, ओबीसी महाराष्ट्रात इथून पुढे उरणार नाही. एका बाजूला ओबीसी आमचा डीएनए आहे असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचा आरक्षण शांत डोक्यांने संपवायचं, हे महापाप इथल्या सत्ताधाऱ्यांनी  केलं आहे. कोर्टात जाऊन चालणार नाही आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. दोन वर्ष बदनाम केल जातं आहे. आमच्यावर हल्ले केले जात आहे. महाराष्ट्राच्या ओबीसींनी आता जागं झालं पाहिजे नाहीतर तुमचं आरक्षण आता कोणीही देणार नाही, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणालेत हाके?

महाराष्ट्रामधील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने काल काही आकडेवारी जाहीर केली. महाराष्ट्रातील ओबीसींना माझा सांगणं आहे. तुमचं आरक्षण संपलं आहे, तुम्ही झोपा काढा, गेली दोन-तीन वर्ष रात्रंदिवस आतडी तुटेपर्यंत मी महाराष्ट्राला सांगतोय, ओबीसीचा आरक्षण संपले, बलुतेदार आणि अलुतेदार यांचे सामाजिक न्याय हक्क संपले आहेत, आणि शासन त्याला खतपाणी घालत आहे, राधाकृष्ण विखे पाटील सारख्या मंत्र्यांने आज महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा पुढाकार घेतला आहे, आज महाराष्ट्रामध्ये 48 लाख कुणबी नोंदी शिंदे समितीच्या स्थापनेपासून आणि बारा लाख प्रमाणपत्र वाटले असं जाहीर केलं जातं, आता पुन्हा शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाते, पुन्हा याविरोधात दाद मागणाऱ्या याचिकेच्या विरोधामध्ये कौशल स्थापन करायचा प्रयत्न केला जातोय, असंही हाकेंनी म्हटलं आहे.

तर, इथून पुढे महाराष्ट्रात ओबीसी महाराष्ट्रात उरणार नाही मूळ ओबीसी, सामाजिक दृष्ट्या मागास ओबीसी, बलुतेदार अलुतेदार ओबीसी, भटक्या विमुक्त जातींचा ओबीसी, तुम्ही झोपा काढा, तुमचं रिझर्वेशन संपलं आहे, भाजपा असो किंवा सत्तेतील सगळी माणसं असो, एका बाजूला सांगायचं ओबीसी आमचा डीएनए आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसींचं आरक्षण मात्र शांत डोक्याने संपवण्याचं महापाप इथल्या सत्ताधाऱ्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, कोर्टात जाऊन फक्त चालणार नाही, न्यायालयीन दाद मागून चालणार नाही, तर महाराष्ट्रातील ओबीसीने रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, गेली दोन वर्ष झालं आम्हाला बदनाम केलं जातंय, आम्हाला शिव्या दिल्या जातात, आमच्यावर हल्ले केले जात आहेत, आमचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला जातोय, तेव्हा महाराष्ट्रातील ओबीसीने जागा व्हावं नाहीतर तुमचं आरक्षण आता कोणीही माघारी देणार नाही आणि महाराष्ट्रातली मागासवर्गीय ओबीसी आज रोजी त्यांचा रिझर्वेशन संपलेला आहे, असंही पुढे हाके म्हणालेत.

admin
Author: admin

और पढ़ें