Search
Close this search box.

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई पुणे मार्गावर हजारो प्रवासी प्रवास करतात. मुंबई पुणे मार्गावर शेकडो एसटी बस धावतात.  पुणे मुंबई हायवेवर केमिकल टँकर उलटल्याना वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागील जवळपास  20 पेक्षा अधिक तास येथे वाहतूक कोंडी आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर  50 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जागच्या जागी वाहने थांबली आहेत.   पुणे मुंबई एक्सप्रेस लागलेल्या या भयानक ट्रफिक जॅममुळे ST प्रशासनाने घेतला मोठा निर्णय घेतला आहे.  पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे -मुंबई हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाट येथील आडोशी बोगद्याजवळ 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एक केमिकल टँकर उलटला. यामुळे मोठी वाहूक कोंडी झाली.  वाहतूक कोंडी अजूनही कायम असल्याने एसटी प्रशासनाने बलच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली कडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार अशी माहिती एसटी प्रशासनातर्फे देण्यात आली.

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 37 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल.

admin
Author: admin

और पढ़ें