Search
Close this search box.

BMC Election 2026 Voting: मोठी बातमी: मुंबईत मतदान करुन परतलेल्यांच्या बोटावरची शाई पुसली, एकच खळबळ, आयुक्त म्हणाले…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने (Voting Ink Mark) खूण केली जात आहे. पण या मार्करची शाई बोटावरुन पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बोटावर मार्करने खूण केल्यानंतर फक्त नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली मुंबई महानगरपालिकेचे (BMC Election 2026) आयुक्त भूषण गगराणी यांनीही दिली. कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे यंत्र वापरले जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. मग निवडणूक आयोगाने आताच हे मशीन का वापरले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच मुंबईत गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली तेव्हा निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यानुसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे.

Maharashtra Elections 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले?

आजच्या महापालिका आणि सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत काही महत्वाचे मतदानाचे आकडे समोर आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी 9.30 पर्यंत ६.९८% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 7 ते 8 या एका तासात अंदाजे ७ ते ८% मतदान झाले आहे.

तर पुण्यातील पहिल्या दोन तासांत फक्त ५.५% मतदान नोंदले गेले आहे.

सोलापूरमध्ये सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.८६% झाली आहे.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.४५% इतकी आहे.

परभणी शहर महानगरपालिकेसाठी सकाळच्या दोन तासांमध्ये 9.10% एवढं मतदान…

मालेगाव महापालिका निवडणुकीत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 11.09 टक्के मतदान…

अमरावती महानगरपालिका निवडणूक – सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 6.6 टक्के मतदान..

admin
Author: admin

और पढ़ें