नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि आरोग्याचे जावे, यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी) आपण खालीलप्रमाणे काही साधे आणि प्रभावी धार्मिक तसेच ज्योतिषीय उपाय करू शकता. नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी ज्योतिषशास्त्र डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत.
1. दिवसाची सुरुवात (धार्मिक विधी)
ब्रह्म मुहूर्तावर उठणे : वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा हळद मिसळून स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
सूर्यदेवाला अर्घ्य : स्नान झाल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी, कुंकू, अक्षदा आणि लाल फूल घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे आत्मविश्वासात वाढ होते आणि मान-सन्मान मिळतो. (मंत्र: ‘ॐ घृणि सूर्याय नमः’)
2. देवदर्शन, पूजा हवन आणि यज्ञ
लक्ष्मी गणेश पूजा आणि हवन : कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपतीला दूर्वा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे येणाऱ्या वर्षात कार्यात विघ्न येत नाहीत. लक्ष्मी हवन करावे.
कुलदैवत आणि इष्ट देवतेचे स्मरण : आपल्या कुलदेवतेचे आणि इष्ट देवतेचे दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करावी. शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन हवन करून घ्यावे.
3. ज्योतिषीय उपाय (समृद्धीसाठी)
तुळशी जवळ दिवा : संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-शांती नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
शनि राहू शांति हवन
कालसर्प, ढैया, श्राप योग प्रेत योग व साडे सती असलेल्यांनी शनी व राहू चे शांति हवन करावे
गोसेवा (गायीला चारा) : ज्योतिषशास्त्रात गोसेवेला खूप महत्त्व आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी गायीला हिरवा चारा किंवा गूळ-पोळी खाऊ घातल्यास ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात (विशेषतः बुध आणि गुरू ग्रह मजबूत होतात).
मिठाचा उपाय : घराची नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी, पाण्यात थोडे खडे मीठ टाकून घराचा लादी/फर्शी पुसावी.
4. दानधर्म (सर्वात प्रभावी उपाय)
वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना किंवा गरिबांना अन्न, ब्लँकेट किंवा कपडे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यामुळे शनी आणि राहूचे दोष कमी होतात.









