Search
Close this search box.

‘दिवसाला 12 ते 13 कोटी रुपये…’; विरोधी पक्षावर दमानिया संतापल्या, कारण ठरलं पुणे जमीन प्रकरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रकाशझोतात आणलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात मोठा आरोप केला आहे. मुंढवा जमीन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. “सरकारकडून पुणे कोर्टात मुंढवा जमीन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून याचिका दाखल केली आहे. हा अजित पवार, पार्थ पवार, शीतल तेजवनी यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे,” असं दामनिया यांनी म्हटलं आहे.

पार्थ पवारांचं नाव एफआयआरमध्ये हवं

“मात्र आपण हे होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांविरोधात आपण याचिका दाखल करणार,” असंही दमानिया यांनी म्हटलं आहे. “पार्थ पवार यांचं नाव काल एफआयआरमध्ये यायला पाहिजे. उच्च न्यायालयाने पार्थ पवार यांचं नाव का नाही हे विचारलं आहे,” अशी आठवण दमानिया यांनी करुन दिली. सरकारला इशारा देताना अंजली दमानिया यांनी, “जी फसवणूक झाली आहे त्याची शिक्षा लोकांना मिळाली पाहिजे,” असंही म्हटलं आहे.

अधिवेशनावर रोजचा कोट्यवधींचा खर्च होतो आणि आमदार…

हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्यांसंदर्भातील प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बिबट्याचा ड्रेस परिधान करुन गुरुवारी विधानसभेत दाखल झाले होते. यावरुनही दमानियांनी टोला लगावला आहे. “फॅन्सी ड्रेस ,फॅशन शो म्हणायचं का? आमदार काय ड्रेस घालून येत आहेत. अधिवेशनावर एका दिवसाचा 12 ते 13 कोटी रुपये खर्च होत आहे. हे असे ड्रेस घालून येत आहेत. आमदारांची काय बुद्धीमत्ता आहे,” असा टोला दमानियांनी लगावला.

विरोधी पक्षाने महाराष्ट्रासाठी लढलं पाहिजे

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात न मांडल्याबद्दलही दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. “विरोधी पक्ष नवीन विषय मांडेल असं वाटतं होतं. ते मांडत नाही. गायरान जमीन, आरोग्य, शिक्षा यावर सरकारने श्वेत पत्रिका काढावी. 2000 ते 2025 कालावधीतील श्वेतपत्रिका काढावी. महसूल विभागकडून इशारा पत्र काढावीत. अनियमितता काढावी आणि दोषींना 24 तासात बडतर्फ करण्याचा आदेश काढावा. गृहखात्याने इशारा पत्र द्यावं. विरोधी पक्षाने महाराष्ट्रासाठी लढावं,” असं दमानियांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध कोर्टात जाणार

“मी कोर्टात जाणार आहे. खारगे समितीकडे तिसरं सबमिशन करणार आहे. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल करणार. मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याची पाळी आली आहे. 21 कोटी भरण्यास सांगितलं. 42 कोटी सांगितलं. उद्योग विभागाने एफआयआर करून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. उदय सामंत यांच्याशी बोलणार आहे. कोर्टाची ऑर्डर आणून जप्तीची वसुली करणार,” असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

“शीतल तेजवानीच्या घरावर दोन वेळ कारवाही झाली. रोख रकमेने व्यवहार झाला असावा पण ते दिसत नाही,” असंही दमानिया म्हणाल्या.

admin
Author: admin

और पढ़ें