Search
Close this search box.

बबली खातून भूमी शर्मा बनली, आधारकार्ड-पॅनकार्ड बनवलं, हिंदू मुलासोबत लग्न केलं, बांगलादेशी महिलेचा धक्कादायक कारनामा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बांगलादेशातील घुसखोर ही देशासाठी मोठी डोकेदुखी आहे. बांगलादेशातून अनेकदा अवैधरित्या घुसखोरी होत आलेली आहे. भारतीय जवान, पोलीस प्रशासनाकडून अशा अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येतं. पोलिसांकडून नेहमी याबाबत कडक कारवाई करण्यात आलेली आहे. पण तरीही बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. विशेष म्हणजे अनेक बांगलादेशी नागरीक भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करतात आणि त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आणि इतर कायदेशीर कागदपत्रे देखील आढळतात. त्यामुळे अशा नागरिकांना शोधायचं कसं? असा प्रश्न पोलिसांनादेखील पडत असावा. पण पोलीस अतिशय अचूकपणे अशा बांगलादेशींना शोधून काढतात. देहरादून पोलिसांनी अशाचप्रकारे दोन बांगलादेशी महिलांना शोधून काढलं आहे. यापैकी एक महिला ही विटभट्टी येथे मजुरीचं काम करते. तर दुसऱ्या महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी चांगलाच प्रताप केल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचं काम करणाऱ्या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिला आता परत बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या एक महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने अटक करण्यासारखंच काम केलं आहे. या महिलेकडे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळलं आहे. तसेच तिने भारतात येवून एका हिंदू तरुणासोबत लग्न करुन नाव देखील बदललं आहे. तिचं हे कृत्य आता पोलीस तपासात उघड झालं आहे.

या प्रकरणात अटक झालेली महिला ही कोरोना संकट काळात योग्य संधी साधत बेकायदेशीरपणे बांगलादेशातून भारतात शिरली होती. तिने भारतात येताच आपलं नाव बदलण्याचं काम केलं. तिने भूमी शर्मा नावाचे आपले खोटे कागदपत्रे बनवले. तिचं बबली खातून असं खरं नाव होतं. पण तिने भूमी शर्मा असं नाव करुन घेतलं. त्यानंतर तिने देहरादून येथे एका हिंदू तरुणासोबत लग्न केलं.

पोलिसांनी या प्रकरणी संबंधित महिलेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेला बनावट कागदपत्रे बनवण्यास मदत करणाऱ्यांचा देखील पोलिसांकडून आता शोध सुरु आहे. या माध्यमातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेली दुसरी बांगलादेशी महिला ही 2023 मध्ये बेकायदेशीरपणे बॉर्डर क्रॉस करुन भारतात आली होती. ती मजुरीचं काम करायची. तिला आता लवकरच भारत सरकारकडून बांगलादेशात पाठवलं जाणार आहे. विशेष म्हणजे याआधी ऑपरेशन कालनेमीच्या अंतर्गत 17 बांगलादेशींवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें