Search
Close this search box.

पूल तुटला, धुळीचे लोट उसळले अन्…; किंकाळ्याच्या आर्त हाकेत 32 खाण कामगारांचा मृत्यू… थरकाप उडवणारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ समोर येतात, जे सातत्यानं चिंतेत भर टाकताना दिसतात अशाच व्हिडीओंमध्ये आता एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. दक्षिण पूर्व काँगो येथील कलंदो येथील तांबे आणि कोबाल्टच्या खाणीतील ही दुर्घटना असून, शनिवारी इथं एक भयावह घटना घडली. एकाएकी पूल ढासळल्यानं यादुर्घटनेत 32 खाण कामगारांचा मृत्यू ओढावला.

स्थानिकांच्या माहितीनुसार प्रचंड पावसामुळं हा पूल सुस्थितीत नव्हता. मात्र, इथं अवैधरित्या खाणकाम करणाऱ्या खाण मालकांनी मात्र सातत्यानं पुलाच्या स्थितीसंदर्भात देण्यात आलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि कामगार या पुलावर चढले. याच दरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आणि अनेकांच्याच काळजात धस्स झालं. AP च्या वृत्तानुसार स्थानिक गृहमंत्री रॉय कोम्बा मायोंडे यांच्या माहितीनुसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लुआलाबा प्रांतातील मुलोंडोमध्ये असणाऱ्या कलंदो खाणीतील पूल वाहून गेल्याचं सांगितलं. प्रचंड पाऊस आणि भूस्खलनाचा धोका याबाबतचा इशारा देऊनही अवैधरित्या इथं खाणकाम सुरूच होतं. जिथं प्रतिबंधित ठिकाणी कामगार केले आणि या पुलावर इतकी गर्दी झाली की तो क्षणात कोसळला.

काही कळायच्या आतच पूल कोसळल्यानं तिथं असणाऱ्यांनी घाबरून आजुबाजूच्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि यामध्येच अनेकांचा मृत्यू ओढावला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या साधारण 32 ते 40 दरम्यान सांगण्यात येत आहे. दरम्यान य़ा खाणीत मागील काही वर्षांमध्ये असणारी लष्करी उपस्थिती वादाचं कारण ठरत आहे. इथं सैनिक अवैधरित्या खाणकाम करणाऱ्यांना रोखण्यासाठी येतात. ज्यामुळं खाण कामगार आणि त्यांच्यामध्ये कायमच तणाव पाहायला मिळतो. इथं एक स्थानिक सहकारी संस्था खाणकामगारांना काम देते तर, परवानाधारक चिनी कंपन्या या खाणीचं कामकाज पाहतात.

https://x.com/siddharthkara/status/1990225312156901869?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1990225312156901869%7Ctwgr%5E03bef7e3a3a33ab469b88d9fc5a6699821c78454%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fworld%2Fcongo-mine-bridge-collapse-above-32-people-killed-in-congo-copper-mine-scary-horrific-video-viral%2F957786

चीनची वादात काय भूमिका? 

अहवालानुसार काँगोच्या जवळपास 80 टक्के कोबाल्ट उत्पादनावर चीनमधील कंपन्यांचा वरदहस्त असून, मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनं यांचा वापर तिथं केला जातो. या कंपन्यांवर बालमजदुरी, धोकादायक कामाच्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार असे कैक गंभीर आरोप आहेत, शिवाय कंपनीकडून खाणकामगारांसाठी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही. काँगोमध्ये खनिजसंपदा प्रचंड प्रमाणात असली तरीही इथं राजकीय अस्थिरता असल्यानं स्थानिक पातळीवर लाखो नागरिक बेघर आहेत, उपासमारीचं प्रमाण अधिक असून इथं आजारपही प्रचंड प्रमाणआत आढळतं हे दाहक वास्तव. अशा स्थितीत निरपराध खाणकामगारांवर ओढावलेला मृत्यू पाहता या घटनेची जबाबदारी कोण घेणार? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें