नोएडा येथील निठारी हत्याकांड आठवूनही आजही अंगावर काटा येतो. 29 डिसेंबर 2006 रोजी व्यावसायिक मोनिंदर सिंह पंधेर याच्या घरामागे असलेल्या एका नाल्यात आठ लहान मुलांचे सांगाडे सापडले होते. त्यानंतरच एका भयंकर हत्याकांडाचा खुलासा झाला होता. 2005 आणि 2006 दरम्यान डझनभर मुलं आणि मुली बेपत्ता झाले होते. त्यातील काही जणांचे मृतदेह त्याच नाल्यात व जवळपास सापडले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. मात्र निठारी हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेला सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. सुरेंद्र कोली याच्यावर 16 केस दाखल करण्यात आले होते.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आरोपी सुरेंद्र कोलीची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली होती. त्यानंतर कोली आता जेलमधून बाहेर येणार आहे. दरम्यान या प्रकरणात निर्णय देताना न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर तीव्र टीका केली आहे. पोलिसांनी निठारी हत्याकांडातील महत्त्वाच्या तपासाच्या दिशेकडे दुर्लक्ष केले, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
सुरेंद्र कोली हा या हत्याकांडातील आरोपी असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. सरन्यायाधीश बी.आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाशी सहमती दर्शवली तसंच, फक्त संशयाच्या आधारावर दोषी ठरवले जाऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.
काय आहे हे प्रकरण?
मोनिंदर सिंह पंढेर हा मुळचा पंजाबचा आहे. 2000 मध्ये त्याने नोएडात एक घर घएतले. सुरुवातीला तो पत्नी आणि मुलासह येथे राहत होता. मात्र 2003मध्ये दोघे पंजाबमध्ये शिफ्ट झाले. तिथेच त्याना एका नोकराची गरज भासली तेव्हा त्यांनी सुरेंद्र कोलीला बोलावून घेतले. सुरेंद्र कोली हा मुळचा उत्तराखंडचा होता. सुरेंद्र मोनिंदरची सगळी कामे करायचा. तिथूनच या हत्याकांडाची सुरुवात झाली.
मोनिंदर सिंह हा निठारीतील घरात कॉलगर्ल बोलवायचा. त्यातूनच कोलीतील विकृती जागी झाली. सुरेंद्र कोली हा मुलांना चॉकलेट-बिस्किटचे आमिष दाखवून घरी बोलवायचा. त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्यांनतर मृतदेह बाथरुममध्ये घेऊन जाऊन छोटे छोटे तुकडे करायचा. पोटाचा हिस्सा कुकरमध्ये शिजवून खायचा आणि इतर मृतदेह नाल्यात फेकून द्यायचा, असं समोर आलं होतं.