नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात 7 जण अडकल्याची घटना आज घडली. या घटनेचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या महिला येथे कशा पोहोचला आणि त्यांना कसं वाचवण्यात आलं पाहा त्याचा थरारक अनुभव.
नांदेड येथीलसहस्त्रकुंड धबधब्याचा प्रवाह वाढल्याने 5 महिला आणि 2 लहान मुलं पाण्याच्या प्रवाहात अडकल्या. पैनगंगा नदीचे पाणी कमी झाल्याने धबधब्याच्या वरील खडकवारून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ही सगळी लोकं तेथेच अडकली. इसापूर धारणातून पाणी सोडल्याने अचानक पाणी सहस्त्रकुंड धबधब्यावर वाढले. एकमेकांना घट्ट धरून एका खडकावर सर्वजण थांबले. या सगळ्याचा बराच काळ लोटला. बाहेर काढण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि प्रशासनाकाडुन प्रयत्न सुरु करण्यात आले.
नांदेड – सहस्त्रकुंड धबधब्याच्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या महिला आणि मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. थर्माकॉलच्या तराफ्याला दोरी बांधून स्थानिक मच्छीमारांनी काढले बाहेर काढले.
पावसामुळे नद्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. या पावसाचा सर्वाधिक परिणाम पैनगंगा नदीवर झाला होता. नदीला आलेल्या पुरामुळे इस्लापूर (ता. किनवट) येथील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झाले होते. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला हा धबधबा सध्या प्रचंड वेगाने कोसळत असल्याने परिसरात थरारक दृश्य पाहायला मिळाले होते.
पावसाळ्यात आकर्षणाचा विषय
सहस्त्रकुंड धबधबा वर्षभर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. परंतु पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सध्या पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने या धबधब्याचे विक्राळ दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक इस्लापूर येथे गर्दी करत आहेत. सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू असून धबधब्याच्या प्रचंड जलप्रवाहामुळे परिसरात प्रचंड गडगडाट होतो. हा आवाज आणि हे दृश्य पाहण्यासारखे असते.
सहस्रकुंड धबधब्याचं आक्राळ विक्राळ रूप, प्रचंड वेगानं कोसळणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात सलग पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक सतर्क झाले आहेत. पावसामुळे शेतीला पाणी मिळून फायदा होत असला तरी नद्यांना आलेला पूर ही चिंता वाढवणारी बाब आहे. पैनगंगा नदीचा पाणीस्तर जलद गतीने वाढत तेव्हा प्रशासन नागरीकांना प्रवाहापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.








