बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुरुवातीला त्यांना नियमित उपचारांसाठी ठेवण्यात आले होते; मात्र भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढू नये, यासाठी त्यांना मागील काही दिवसांपासून ICU मध्ये ठेवण्यात आल्याचं कळतंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी धर्मेंद्र यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला, त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून, सांगितले जाते की ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अचूक तपशील मात्र अद्याप उपलब्ध नाही.
Dharmendra: चाहत्यांची काळजी वाढली
धर्मेंद्र यांच्या प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे रुग्णालयात येणं-जाणं वाढलं आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या कुटुंबाकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही. धर्मेंद्र यांचे वय आणि पूर्वीच्या आरोग्य समस्या पाहता डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांची तब्येत लवकर सुधारावी, अशी प्रार्थना देशभरातील चाहत्यांनी व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सुरुवातीला ही फक्त नियमित वैद्यकीय तपासणी असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याची माहिती मिळत होती. आज सकाळी धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने ICU तून व्हेंटिलेटरवर शिफ्ट केल्याची माहिती समोर येत असल्यानं चाहत्यांची काळजी वाढलीय.
Dharmendra: धर्मेंद्र यांनी दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट
‘बॉलिवूडचे ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, करारी व्यक्तिमत्व आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत.








