पुण्यात पुन्हा मोठा गँगवार झाला आहे. कोंढव्यात मुळशी पॅटर्नचा थरार पहायला मिळाला. भररस्त्यात रिक्षा चालकावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. या गोळीबार प्रकरणात आंदेकर टोळीचे कनेक्शन समोर आले आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यात सातत्याने टोळली युद्ध भडकत असून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला आहे. गणेश काळे या गोळीबारात जागीच ठार झाला आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीच्या दत्ता काळे याचा भाऊ असल्याची प्राथिमक माहिती समोर यते आहे. वनराज हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंदेकर ने दत्ता काळे याला खोलीसाठी पैसे देऊन आंबेगाव पठार भागात आरोपींच्या हलचालींवर लक्ष ठेवायला सांगितलं होत.
गणेश येवलेवाडीत राहायला होता. 9 पिस्तूले आणून ठेवली होती. ही पिस्तूले मध्यप्रदेशातून आणण्याची जबाबदारी सोम्याच्या टोळीतील सदस्य समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांच्यावर देण्यात आली होती. हे चौघे एका चारचाकी मोटारीतून धुळे मार्गे मध्यप्रदेशात गेले. तेथून त्यांनी 9 पिस्तूले आणली.
खून झालेला गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे. गणेश काळेवर सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले आहेत. याच समीर काळे याने वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले समीर काळे याने ही पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. समीर हा सध्या कारागृहात आहे. त्याचा भाऊ गणेश याचा खून करण्यात आला आहे.









