मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरीबद्दल आज मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढून सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन केलं. या मोर्च्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थितीत होते. ठाकरे कुटुंबाची नवीन पिढी अमित ठाकरे, आदित्य ठाकरे मंचावर दिसून आलेत. हा सत्याचा भव्य मोर्चा फॅशन स्ट्रिटवरून मेट्रो सिनेमाच्या मार्ग मुंबई महापालिकेवर धडकला. त्यानंतर इथे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाषण केलीत.
पण मुंबईतील या सत्याचा मोर्चात सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते अमित ठाकरे यांनी. कारणही तसंच होतं, खरं तर अमित ठाकरेंना जरा ओळखणे कठीण झालं होतं. कारण आजच्या मोर्च्यात अमित ठाकरेंचा लूक बदलेला दिसून आला. अमित ठाकरे यांचा पूर्वीचा लूक म्हणजे वाढलेले केस, दाढी, जिन्स आणि पायातले स्पोर्ट्स शूज असे असायचे. या लूकमुळे अमित ठाकरे यांचं व्यक्तिमत्त अतिशय वजनदार वाटायचं असे अनेकांना वाटायचं. पण आजच्या मोर्च्यात अमित ठाकरेंचा नवीन लूक अनेकांना भुरळ घातली आहे.
अमित ठाकरे आज क्लिन शेव्ह करुन आले होते.









