सोनिकाने स्पर्धेत 125 किलो स्क्वॅट, 80 किलो बेंच प्रेस आणि 145 किलो डेडलिफ्ट केले. तिच्या ताकदीचा आणि फोकसचा सगळ्यांनाच अभिमान वाटला. पण जेव्हा स्पर्धेनंतर प्रेक्षकांना समजलं की सोनिका 7 महिन्यांची गर्भवती आहे, तेव्हा संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि निगराणीखाली सोनिकाने स्पर्धेची (Delhi Police constable) तयारी सुरू ठेवली होती. तिनं सांगितलं की, “प्रेग्नंसी म्हणजे कमजोरी नाही. योग्य काळजी घेतली, तर शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहतात.” डॉक्टरांनी थांबायचं सुचवलं, पण सोनिका जिद्दीने पुढे गेली.
सहकाऱ्यांनी सोनिकाला दिला प्रशिक्षण थांबवण्याचा सल्ला
मे महिन्यात गर्भावस्था समजल्यावर घरच्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोनिकाला प्रशिक्षण थांबवण्याचा सल्ला दिला होता. मात्र ती म्हणाली की, “मी आई होणार आहे, पण त्याचबरोबर मी एक खेळाडूही आहे. माझं दोन्ही रूप जपणं मला महत्त्वाचं वाटतं.” ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली दररोज वर्कआउट करत राहिली. तिच्या वर्कआउटमध्ये हलके स्ट्रेचिंग, वेटलिफ्टिंगचे मॉडिफाइड सेट्स आणि ध्यान यांचा समावेश होता.
प्रेग्नंसी लपवण्यासाठी सैल कपडे, पण मंचावर येताच सगळ्यांना धक्का
स्पर्धेदरम्यान सोनिकाने सैल कपडे घातले होते, जेणेकरून कोणी तिची अवस्था ओळखू नये. बेंच प्रेसच्या वेळी जेव्हा तिचा पती तिला मदत करत होता, तेव्हाही कुणालाच शंका आली नाही. पण जेव्हा सोनिकाने 145 किलो वजन उचललं आणि पदक जिंकलं, तेव्हा आयोजक आणि प्रेक्षक दोघेही थक्क झाले. त्यानंतर सगळ्यांनी तिचं उभं राहून कौतुक केलं.
आंतरराष्ट्रीय लिफ्टर लूसी मार्टिन्सकडून घेतली प्रेरणा
सोनिकाने ऑनलाइन रिसर्च करून आंतरराष्ट्रीय लिफ्टर लूसी मार्टिन्स (Lucy Martins) हिची कहाणी वाचली होती, जी स्वतः गर्भवती असतानाही स्पर्धांमध्ये भाग घेत होती. सोनिकाने इंस्टाग्रामवरून लूसीशी संपर्क साधला आणि तिच्याकडून सुरक्षित वेटलिफ्टिंगच्या टिप्स घेतल्या. ह्याच मार्गदर्शनानं सोनिकाचा आत्मविश्वास आणखीन वाढला.
2014 बॅचची अधिकारी
सोनिका यादव ही 2014 बॅचची दिल्ली पोलिस अधिकारी आहे. सध्या ती कम्युनिटी पोलिसिंग सेलमध्ये कार्यरत आहे. यापूर्वी ती मजनू का टिला भागात बीट ऑफिसर म्हणून अँटी-ड्रग अवेअरनेस कॅम्पेन चालवत होती. 2022 मध्ये तिच्या कार्याची दखल घेत दिल्ली पोलिस कमिशनर यांनी तिला सन्मानित केलं होतं, तर महिला दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही तिच्या जिद्दीचं कौतुक केलं होतं.
सोनिकाचा संदेश
सोनिक म्हणाली की, “आई होणं थांबण्याचं कारण नाही, तर ताकद बनवण्याची वेळ आहे” सोनिकाचं म्हणणं आहे, “जर मनात हिम्मत आणि सातत्य असेल, तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. मग तुम्ही आई होण्याच्या प्रवासात असलात तरी.” तिची ही कथा फक्त खेळाडूंनाच नव्हे, तर प्रत्येक त्या महिलेला प्रेरणा देते जी स्वतःची स्वप्नं आणि मातृत्व दोन्ही जपायचं ठरवते.









