Search
Close this search box.

घाटकोपर ते ठाणे प्रवास सुपरफास्ट होणार, पण 320 झाडे…; Eastern Freeway बाबत मोठी अपडेट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर-ठाणे विस्तार प्रकल्प. मात्र या प्रकल्पाचे काम हाती घेण्याआधीच मोठा वाद उद्भवला आहे. या प्रकल्पासाठी 320 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्याचवेळी 386 झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे.या कामासाठी ‘एमएमआरडीए’ला मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने आवश्यक ती परवानगी मिळाली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर- ठाणेदरम्यान विस्तार करीत आहे. घाटकोपर-ते ठाणे असा प्रवास अतिजलद करण्यासाठी, पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर-ठाणे दरम्यान विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार अंदाजे 13 किलोमीटरचा व 40 मीटर रुंदीचा विस्तारीत मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गाच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. महापालिका घाटकोपरच्या छेडा नगरला ठाण्याच्या आनंद नगरशी जोडण्यासाठी सुमारे 13 किमी लांबीच्या एमएमआरडीएच्या तीन पदरी उन्नत रस्त्यासाठी 2,682 कोटी रुपये खर्चून तोडण्याची शक्यता आहे. या कामासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर येथील 1694 झोपड्या हटव्याव्या लागणार आहेत.

दरम्यान, पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणात कापण्यात वा पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात 4,175 नव्या वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’ने दिली. दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी- घाटकोपरदरम्याच्या भागातील 127 ‘पिंक ट्रम्पेट’ झाडे वाचविण्यासाठी मार्गाच्या संरेखनात बदल करण्यात आल्याचेही ‘एमएमआरडीए’ने सांगितले. झाडांचे पुनर्रोपण वैज्ञानिक पद्धतीने केले जाणार असून पुढे या झाडांची योग्य ती देखरेख केली जाईल. तर अधिकाधिक झाडांचे संवर्धन व्हावे यादृष्टीने त्यांचे पुनर्रोपण व देखरेख केली जाणार असल्याचेही ‘एमएमआरडीए’ने आश्वासित केले आहे. दरम्यान नव्या 4,175 झाडे प्रकल्प क्षेत्रातील मोकळ्या जागेत लावण्यात येतील.

हिवाळ्यात घाटकोपर ते ठाणे दरम्यान ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना विक्रोळीजवळ महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या झाडांवर मोठ्या संख्येने फुललेल्या गुलाबी फुलांचे सुंदर दृश्य पाहण्याची संधी मिळते.टॅबेबुइया रोझा ही झाडे हिवाळ्यात प्रवाशांसाठी मुख्य आकर्षण केंद्र बनतात. यात 706 झाडांमध्ये दुर्मिळ झाडांचा समावेश आहे.

admin
Author: admin

और पढ़ें