Search
Close this search box.

ठाण्यातील 14 इमारती अती धोकादायक जाहीर! घरं रिकामी करण्याचे आदेश, दमानिया म्हणाल्या ‘शिंदे चांगले, पण त्यांचे व्याही…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ठाण्यातील 14 इमारतींना अती धोकादायक जाहीर करण्यात आलं आहे. कोपरीतल्या दौलतनगरमध्ये या इमारती आहेत. इमारतीतमधील रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावली असून घरं खाली करण्यास सांगितलं आहे. पुनर्वसन व्हावं यासाठी काहींनी विरोध दर्शवला आहे, तर काहींनी पाठिंबा दिला. त्या अनुषंगाने आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया विरोध करणा-यांच्या भेटीसाठी ठाण्यात दाखल झाल्या होत्या.  मात्र दुसरीकडे आता समर्थन असणारे नागरिक फटाके फोडत ढोल ताशे वाजवत जल्लोष करत आहेत.

 

अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, “मला आज अतिशय दुःख होत आहे की आनंद दिघेंच्या ठाण्यात आज लोकांची इतकी दुर्दशा झाली आहे. त्यांची ही कॉलनी अतिशय व्यवस्थित होती. कॉलनीला धोकादायक घोषित करून लाईट, पाणी तोडून लोकांना खाली करण्यास भाग पाडलं. लोकांना भाग पाडल्यानंतर त्यांना गेले नऊ महिने एक दमडीसुद्धा भाडं मिळालं नाही. माझ्या मागे लोक आहेत ते सगळे मध्यमवर्गीय आहेत आणि दुर्दैव असं की यांचं काम लक्ष्मण कदम नावाच्या व्यक्तीने घेतलं जे एकनाथ शिंदेंचे व्याही आहेत”.

 

“मी एकनाथ शिंदे यांना या विषयावर तीन वेळा भेटले, दोनदा फोनवरुन चर्चा केली. फोनवर चर्चा केली असंख्य वेळा मेसेजेस केले. एवढं केल्यानंतर मला असं वाटत होतं की एकनाथ शिंदे नक्की कारवाई करतील. त्यांनी मला तसं आश्वासन पण दिलं होतं. पण एकीकडे ते एक वेगळे व्यक्ती आहेत पण त्यांचे व्याही जे आहेत ते अतिशय वेगळे आहेत. त्यांनी इथल्या लोकांना त्रास देणे सुरूच ठेवलं. मी ट्विट देखील केलं होतं की त्यांच्या विरोधात तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेईन. असं म्हटल्याबरोबर ताबडतोस त्यांनी बँड बोलवला, बँड बाजा सुरू झाला आणि असं दाखवलं की रेडेव्हलपमेंट आजपासून सुरू होत आहे,” असाही आरोप त्यांनी केला.

“पण त्यांनी कटकारस्थान असं सुरू केलं या लोकांविरुद्ध 50 कोटीचा दावा ठोकला आहे. इतर कोणालाही ही रेव्हलपमेंट देता येणार नाही. माझी एकनाथ शिंदे यांना कळकळीची विनंती होती. इथे मधला कोणी नको हा प्रकल्प तुम्ही म्हाडा मार्फत मोठ्या कंपनीला द्या अशी माझी विनंती होती,” अशी माहिती त्यांनी दिली.

“मी या सर्व लोकांच्या माध्यमातून, आणि स्वतः विनंती करते की कृपा करून हा प्रोजेक्ट एखाद्या मोठ्या कंपनीकडे द्या. कारण तुम्ही स्वतः आता शनिवारीच डिक्लेअर केले तरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे अडकतात, लोकांना भाडे मिळत नाही. आताच्या घटकेला मी आता जिथे उभी आहे ते धडधडपणे इथे दिसत आहे की नऊ महिने या लोकांना भाडं मिळालं नाही. हे मध्यमवर्गीय आहेत, त्यांच्याकडे एवढा अफाट पैसा नाही तिथे एवढा पैसा खर्च करून घर घेऊ शकतील. आताच्या घटकेला माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर याचा तोडगा काढा,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेला ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील दौलत नगरमधील रहिवाशांचा विरोध कायम असताना ठाणे महापालिकेने अखेर येथील एका इमारतीवर हातोडा टाकून ही इमारत तोडली आहे.
या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव असताना विकासकाने कोणत्याही प्रकारचा करारनामा रहिवाशांसोबत केलेला नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याशिवाय राहण्याची पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने इमारत तोडताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेसाठीच इमारती धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप दौलत नगरमधील रहिवाशांनी केला आहे.या कारवाईला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें