मुंबई शहर व उपनगरात मोठ्या झपाट्याने मेट्रोचा विस्तार होत आहे.मुंबई शहर व उपनगरे मेट्रोच्या सहाय्याने जोडली जात आहेत. याप्रकल्पांमुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. सध्या मेट्रो 1, मेट्रो 3, मेट्रो 7 ए आणि 2ए या मेट्रो मार्गिका सुरू आहेत. तर काही प्रकल्पांची कामे सुरू असून लवकरच या मार्गिका सुरू होणार आहेत. सध्या मेट्रो मार्गिका 9 आणि 7 च्या एकत्रीकरणासाठी कामे सुरू आहेत.
मेट्रो मार्गिका 7 (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका 9 (पहिला टप्पा – दहिसर पूर्व ते काशीगाव) शी जोडण्याच्या कामासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण (System Integration) आणि सुरक्षा चाचण्या (Safety Trials) हाती घेण्यात येत आहेत. ‘लाल मार्गिका विस्तार’ या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा असून, अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान अखंड व सुसंगत प्रवासासाठी अत्यावश्यक आहे.
सध्या मेट्रो मार्गिका 7 वर 13 स्थानकांदरम्यान सेवा सुरू असून, मार्गिका 7 ची विस्तारित मार्गिका 9 चे काम अंतिम टप्प्यात आहे. RDSO (Research Design and Standards Organisation) ची तपासणी 23 सप्टेंबर 2025 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, Independent Safety Assessor (ISA) चाचण्या आणि ट्रायल रन सुरू आहेत.
मेट्रो मार्ग 9 आणि 7 ए
मेट्रो मार्ग 9 आणि 7 ए हा अंधेरी ते सीएसआयए व दहिसर ते मीरा भाईंदर या मार्गाचा विस्तार आहे. या मार्गिकेवर १0 स्थानकेअसून ते 1 km. (१ किमी लांबी (11.386 km किमी उंच आणि 2.15 km किमी भूमिगत) आहे.
अशी असेल जोडणी
सध्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे, सध्या सुरू असलेली मेट्रो मार्ग 2 ए (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग ((अंधेरी (ई) ते दहिसर (ई) पर्यंत परस्पर संपर्क प्रदान करेल.
अशी असतील स्थानके
दहिसर (पू) ते मीरा-भाईंदर )
1. दहिसर, 2. पांडुरंग वाडी, 3. मिरागाव, 4. काशीगाव, 5. साई बाबा नगर, 6. मेदितिया नगर, 7. शहीद भगतसिंग गार्डन, 8. सुभाषचंद्र बोस स्टेडियम
अंधेरी (पू) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
1. विमानतळ कॉलनी (उन्नत) आणि 2. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (भूमिगत)
