मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोचे लोकार्पण 8 ऑक्टोबर रोजी पार पडले.मुंबई मेट्रो 3चा अंतिम टप्पादेखील आता सेवेत आला आहे.या मेट्रोमुळं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पश्चिम उपनगर ते दक्षिण मुंबईचा प्रवास अवघ्या 1 तासांत पूर्ण होत आहे. मुंबई मेट्रो 3ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. एका प्रवाशाने अलीकडेच मेट्रो प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे.
प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.यात त्याने म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ग्रँड रोड हा प्रवास फक्त 90 रुपयांत झाला आहे. ऐरवी रस्ते मार्गे या प्रवासासाठी 800-900 रुपये भरावे लागतात.त्याने पुढे म्हटलंय की, T2 विमानतळ एक्झिट ते ग्रँड रोड मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी फक्त 35-40 मिनिटे लागली. या प्रवासासाठी फक्त 60 रुपयांचा खर्च आला.त्यानंतर स्टेशनपासून कॅबचा खर्च फक्त 30 रुपये आला. त्यामुळं हा प्रवास फक्त 90 रुपयांत झाला.
विमानतळापासून घरी फक्त 90 रुपयांत पोहोचेन असं कधीच वाटलं नव्हतं. मात्र ही मेट्रो मुंबईकरांसाठी अपग्रेड आहे. हाच प्रवास ओला-उबेरने केला असता तर त्यासाठी 800-900 रुपये खर्च करावे लागले असते, असंही त्याने म्हटलं आहे.
असा आहे तिकीट दर
प्रवाशांना 3 किमीपर्यंतच्या अंतरासाठी 10 रुपये मोजावे लागतील. तसंच, ज्या प्रवासाचे अंतर 3 ते 12 किमी दरम्यान असेल त्यांना 20 रुपये शुल्क असेल. तसंच, 12 ते 18 किमीच्या अंतरासाठी 30 रुपये तिकीट असेल. 18 ते 24 किमीच्या प्रवासासाठी 40 रुपये. 24 ते 30 किमीच्या प्रवासासाठी 50 रुपये मोजावे लागतील. तसंच, 30 ते 36 किमीच्या प्रवासासाठी तिकीट 60 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
प्रमुख स्थानकांसाठी लागणारा तिकीट दर
आचार्य अत्रे चौक ते कफ परेड: 40 रुपये
आरे JVLR ते कफ परेड: 70 रुपये
आरे JVLR ते सिद्धिविनायक: 60 रुपये
दादर मेट्रो ते चर्चगेट मेट्रो: 50 रुपये
मेट्रो तीन वरील स्थानके
कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील.
