सहा महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे असं मोठं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. नारायणगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं. आज इथे उपस्थित राहून मराठा बांधवांनी त्यांचं मोठेपण सिद्ध केलं आहे असंही त्यांनी म्हटलं. गरिबांच कल्याण करू द्या मुंबईला चला असं मी म्हणालो होतो. मी आहे तोपर्यंत मला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. मला साथ द्या,समाजाच्या लेकरांचं कल्याण करू शकतो. जीआर निघाला आहे आता मला चिंता राहिलेली नाही.जीवनात येऊन जे सिद्ध करायचं आहे ते मी केलं आहे असं ते म्हणाले आहेत.
“मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा खूप दिवसाचा, मला आता चिंता नाही. जे सिद्द करायचं होतं ते केलं आहे. गरिब मराठा समाज होरपळताना दिसत नव्हता. मी कधीही नाटक केलं नाही. मी कधीही समाजाला खोटं बोललो नाही. ही गोष्ट खरी आहे की, एखाद्या वेळी एक दोन पावलं पुढे मागं सरकवलं असेल. एखाद्या वेळी चूक झालीही असेल. मला दिसत होतं समाजा खूप तडफडत आहे. लेकी बाळी, पोरं बाळं मोठं करायचं असेल तर शेतीसोबत आरक्षणाचा आधार गरजेचा आहे. रात्रंदिवस तुटून पडलो. माझ्या समाजाच हट्ट होता. लेकरा बाळाला नोकरीपासून, शिक्षणापासून लांब राहावं लागू नये यासाठी प्रयत्न होता,” असं त्यांनी म्हटलं आहे.
‘समाज डूबेल असं वागू नका’
“मी कधीही शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य झिजवलं. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आरक्षणात गेला तर देशाला वेढा टाकण्याची आमच्यात ताकद. जीव टाकला पण मागे हटलो नाही. मी तुमच्या रक्ताशी गद्दारी केली नाही. जे मिळालं त्यात देखील काही जण समाधान व्यक्त करू देत नाही. 45 वर्षात हे पांढरे कपडे घालून गाड्यामध्ये फिरले आणि यातच यांनी मर्दांनगी गाजवली.1 वर्षात मि 58 लाख नोंदी सापडून 3 कोटी मराठ्यांना आरक्षण दिलं. 2 वर्षात मी सगळा मराठा आरक्षणात घातला. हे मिळालं ते खूप मिळालं. उतावळे वागू नका. समाधान माना. सगळ्यांच्या मुंडक्यावर डाव टाकून पाय दिलेत.समाज डूबेल असं वागू नका,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
‘जातीला सांभाळयचं असेल तर शासक बना’
“मी सांगितलेले विचार जपून ठेवा अन्यथा काही फायदा नाही. मराठ्यांनी टंगळ मंगळ बंद करावी. यापुढे मराठ्यांनी शासक आणि प्रशासक बनायचं, शासक बना प्रशासक बनवा, शासक बनले तर कुणाला मागायची गरज पडणार नाही. शासक बनायचं डोक्यात राहू द्या. तुमच्यावरील दारिद्र्य हटवण्यासाठी तुम्ही शासक बना, जातीला सांभाळयचं असेल तर शासक बना. प्रशासक बना,प्रशासनात असले तर दादा बनून प्रशासका समोर हात जोडून उभे राहावे लागते. तुम्ही अधिकारी बनलात तर कसलाही नेता तुमच्यासमोर हात जोडून उभा राहील,” असंही ते म्हणाले.
प्रत्येक क्षेत्रात आपलं लेकरू गेलं तर आपल्या समाजाला आधार होईल. बोगस आरक्षण घेऊन लोक तिथे जाऊन बसलेत. सत्ता असो अथवा नसो प्रशासनात आपले लोक असतील तर ते पक्का खुंटा ठोकतात. आजपासून आपल्याला प्रशासनात लोक घालायचे,तुम्ही शासक बना फोनवर लगेच काम होईल असंही ते म्हणाले आहेत.
पंकजा मुंडेंना दिलं प्रत्युत्तर
“हे निवडणुकीच्या आधी आपल्याला डिवचतात. मी उतर दिलं की हे 3 ते 4 महिने गप्प बसतात. गुलामीचं गॅझेट म्हणणाऱ्या या भिकार अवलादी म्हणतात आणि 4 महिने गप्प बसतात. मग इंग्रज का तुमच्या घरात राहत होते का?.” असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
“इंग्रज तुमच्या घरात राहत होते का म्हणजे तसा अर्थ काढू नका. त्या नाकतोडीला मी बोललो का? कुणाला बोट लावायची गरज आहे का? त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ समजू नका हरामखोरानो, तिच्या सोबत काम करणाऱ्यांनो त्यांना 5 -10 लाखांच्या कामासाठी त्यांना चाटु नका,” असा टोला त्यांनी पंकजा मुंडेंसाठी काम करणाऱ्यांना लगावला आहे.
मराठ्यांनी तिच्या सोबत काम करतांना स्वाभिमान जागा ठेवा, कुणाच्या पायाखाली पाय चाटून काम करू नका. निजाम आमच्या परिवारातील नाही म्हणून गुलामी आहे. तुम्हाला इंग्रजांच्या जनगणनेने आरक्षण दिलं मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का.?आम्ही तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाहीत अशी टीका त्यांनी पंकजा मुंडेंवर केली.
मी कुणालाही घाबरत नाही. तुम्ही फक्त फेसबुक व्हाट्सअॅपला लिहू शकता माजलेल्यांना गप्प करण्याची आमच्यात ताकद आहे. मराठ्यांनी तुम्हाला 30 वर्ष झक मारायला निवडून नाही दिलं अशी टीकाही त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
मराठ्यांनी त्यांच्या डोक्यात पडलेले किडे मारून टाकावेत. हे लोक बदलणार नाहीत. त्यामुळे यांच्यावरील दया माया कमी करा. यांना निवडणुकीत पाडा. यांना पाडलं तर हे मराठयांशी नीट वागतील, इथून पुढे मराठ्यांच्या बाबतीत जे बोलतील त्यांना सोडू नका असं आवाहन त्यांनी केलं.
