दसरा हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण असून यादिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल दशमीचा हा दिवस होता. या तिथीला विजयादशमी असंही म्हटलं जातं. यादिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा केली जाते. दसरा हा चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांसाठी शुभ मानला जातो. दसरा हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पूर्वीच्या काळी हा सण कृषीमहोत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा होती. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे घटाजवळ धान्याची पेरणी केली जाते. तयार झालेले धान्याचे तण देवास वाहणे. सीमोल्लंघनाला जातांना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे. पुढे या सणाला धार्मिक रूप आले, पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला गेला आहे. यादिवशी शस्त्रपूजा करण्याची पंरपरा सुरु झाली. दसऱ्याला पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त काय, महत्त्व जाणून घ्या.या दिवशी शुभ कार्य, गृह प्रवेश, वाहन खरेदी आणि सोनं खरेदी करण्यात येते. दसऱ्याला सोने खरेदी शुभ मानली जाते.
दसरा 2025 शुभ योग!
या विजयादशमीला, रवि योग, नवपंचम योग, सुकर्मा, धृती आणि केंद्र योग असे अनेक शुभ संयोग तयार होत आहेत, जे पूजा, नवीन उपक्रम सुरू करणे आणि रावण दहन यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या योगांमध्ये केलेले कार्य चिरस्थायी आणि फलदायी असते.
दसरा 2025 चा शुभ मुहूर्त
विजय मुहूर्त – दुपारी 02:13 ते दुपारी 03:00
अभिजीत मुहूर्त – दुपारी 11:52 – दुपारी 12:39
पूजा वेळा – दुपारी 01:25 PM ते दुपारी 03:48
दसरा 2025 सोनं खरेदी शुभ मुहूर्त!
खरेदीसाठी शुभ विजय मुहूर्त दुपारी 02:00 ते 03:00 हा दसऱ्याचा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. पौराणिक कथेनुसार, याच काळात देवीने महिषासुराचा वध करून विजय मिळवला. कोणत्याही नवीन कार्याची किंवा वस्तू खरेदीची सुरुवात या मुहूर्तावर करणे सर्वोत्तम मानले जाते.
भूमीपूजन आणि नवीन व्यवसायसाठी शुभ मुहूर्त!
दुपारी 01:00 ते 03:30 हा काळ खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा भूमीपूजन (जमीन खरेदी) करण्यासाठी अत्यंत शुभ आहे.
निशिता मुहूर्त – रात्री 11:50 ते 12:40 जर दिवसा शक्य नसेल तर रात्रीचा हा काळ सोने-चांदी किंवा महत्त्वाच्या वस्तू खरेदीसाठी शुभ मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता खरेदी करता येते, कारण हा दिवस स्वतःच ‘सिद्ध मुहूर्त’ मानला जातो. तरीही विजय मुहूर्त हा सर्व प्रकारच्या खरेदीसाठी सर्वात श्रेष्ठ आहे.
रावण दहनाचा शुभ मुहूर्त
2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:03 ते 7:10 वाजेपर्यंत
दसऱ्याला शास्त्रपूजनाची वेळ
पंचांगानुसार, दसऱ्याला शस्त्र पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 02:09 ते 02:56 पर्यंत आहे.
दसऱ्याला शस्त्र पूजा का करतात?
षोडश मातृकामध्ये सहाव्या क्रमात जी देवी येते तिचं नाव विजया आहे. जगतजननी मत भवानीच्या दोन सखींचे (मैत्रिणी) नाव जया-विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसंच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात तसंच भरण पोषणाचे साधनही आहेत. या अस्त्रांमध्ये विजय देवीचा वास मानून यांची पूजा केली जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केलं जातं. त्यानंतर महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद, कुंकू, फुल अर्पण करून धूप-दीप दाखवून पूजा केली जाते.
