अलिबाग मुरूड मार्गावर मुरुड जवळ पिक अप टेम्पो आणि एसटी बस यांची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. नवरात्री निमित्त मुरूडच्या कोटेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला एसटी बसची धडक लागून झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. जखमींवर मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. टेम्पोमधील सर्व भाविक मुरुड तालुक्यातील मजगाव येथील रहिवासी आहेत. मुरुड जवळ विहुर गावच्या हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य केले
