पर्यटकांच्या (Tourist estination) आवडीच्या ठिकाणांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या लेह लडाखमध्ये सध्या मात्र परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे इथं सुरू असणारं युवा पिढीची आंदोलन. गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये युवा पिढी रस्त्यांवर उतरली असून इथं सरकारविरोधातील निदर्शनं पाहण्यास मिळत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असून, ताज्या माहितीनुसार या आंदोलनाच्या धर्तीवर लेह लडाख भागात सुरक्षेचा चोख बंदोबस्त करत कारगिल क्षेत्रामध्ये कलम 163 लागू करण्यात आला आहे, तर लेहमध्ये कर्फ्यू लागू झाला आहे.
कलम 163 अंतर्गत कोणते नियम लागू?
वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 2023 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 लेहमध्ये लागू करण्यात आला असून, इथं पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही लेखी परवानगीशिवा प्रकारचा मोर्चा, निदर्शनं काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
आंदोलनाला हिंसक वळण, चौघांचा मृत्यू…
लेह लडाखमधील आंदोलनात आतापर्यंच चौघांचा मृत्यू झाला असून, 70 हून अधिकजण गंभीररित्या जखमी झाल्याचं कळत आहे. गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार सोनम वांगचुक यांनी ‘अरब स्प्रिंग शैलीतील निदर्शनं’ आणि नेपाळमधील ‘जेन झी’ निदर्शनांचा उल्लेख केला आणि त्यादरम्यानच चर्चेच्या वळणावर असणाऱ्या या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं.
