Search
Close this search box.

Heavy Rain: सोलापुरात 5 लाख एकर शेतीचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश, ‘एकाही कर्मचाऱ्याने…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 22 हजार 881 शेतकरी बाधित झाले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार 1 ते 22 सप्टेंबरपर्यंत तब्बल 1 लाख 95 हजार 631 हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे.

सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 6 लोकांचा मृत्यू झाला. तसंच 49 जनावरे, 15 हजार 41 कोंबड्या देखील दगावल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 541 घराची पडझड झाली असून, 4058 कुटुंबाच्या घरात शिरलं पाणी शिरलं आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक अहवालतून माहिती, अंतिम आकडेवारीत नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराची परिस्थिती पाहता विभाग प्रमुखांना केंद्र न सोडण्याचे आदेश दिले आहेत. पूरस्थितीत लोकांना मदतकार्य करण्यासाठी कोणत्याही विभागाचे खाते प्रमुख आणि कर्मचारी मुख्यालय सोडू नये असा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.

‘सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जावं’
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्याचा आदेश दिला आहे. आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा असं कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जाणार पाहणी दौऱ्यावर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्रीही मैदानात उतरणार आहेत. उद्या ग्राउंडवर जात करणार पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीही पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून, जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेच्या वतीने 12 हजार 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर असून पूरपरिस्थिती आढावा घेणार आहेत. या जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांना भेट देणार आहेत. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सततच्या पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली आहेत. उपमुख्यमंत्री उद्या पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत

ओला दुष्काळ म्हणजे काय ?
खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही .मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत .पहिला अवकर्षण काळ ज्यात सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं .तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं .

– ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे .

-यात पिके पाण्याखाली जातात .पिकांची मुळे कुजतात .जमिनीची पोषणतत्व धुवून निघतात .

-साठवण व घरे उद्ध्वस्त होतात .

-हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो .

ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ?
राज्य सरकारने ठरवलेले काही प्रमुख निकष असे आहेत –

– पिकांचे नुकसान : 33% किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का ?

-पावसाचे प्रमाण : त्या तालुक्यात /गावात 24 तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का ? (सरासरी पावसापेक्षा खूप जास्त )

-स्थितीची पाहणी : महसूल विभाग कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात

-शेतकऱ्यांची प्रत्यक्ष हानी : शेती शिवाय घर जनावरे रस्ते पाणीपुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो .

– या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करते .

ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर फायदे / मदत
ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना खालील शासकीय मदत दिली जाते :

– पीक विमा / नैसर्गिक आपत्ती मदत -33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते .

-कर्जमाफी / कर्ज मोर्टोरिअम – पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी

-महसूल वसुली स्थगिती – सरकारी महसूल वसुली (वीज, पाणीपट्टी, कर) काही काळांसाठी थांबवली जाते .

-नुकसान भरपाई – घर जनावर विहिरी शेततळे पीक साठा यांचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळते .

-महात्मा गांधी रोजगार हमी योजना (EGS) -ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढविली जाते .

-इतर सुविधा – चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्यांची मदत, आरोग्य शिबिरे अशी मदतही पुरवली जाते .

admin
Author: admin

और पढ़ें