Search
Close this search box.

Pune Crime Pooja Khedkar Family : इकडं पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा शोध लागेना, तिकडं पुण्यातील बंगल्यावर जेवणाचे डबे पोहोचले, नेमकं चाललंय तरी काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नवी मुंबईतून सुरू झालेल्या एका अपघाताच्या घटनेनंतर या प्रकरणात विविध घडामोडी समोर येत आहे. अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कुटुंबावर झाले आहेत. याप्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी दिलेलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचे समोर आले असून, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) आणि आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) हे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या गाडींसह फरार झाले आहेत. तर खेडकरांच्या घरात आता दोन जेवणाचे डबे पोहचले आहेत. हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेलेत? पुजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.

शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलुंड-ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझर गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले, असा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर ट्रक चालकाने मालकाला याची माहिती दिली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली.

अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित गाडीचा मागोवा घेतला. शोध घेतल्यावर MH 12 RP 5000 नंबरची लँड क्रूझर पुण्याच्या बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचं आढळलं. संबंधित बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचं निष्पन्न झालं.

मनोरमा खेडकरने पोलिसांवर कुत्रे सोडले
पोलिसांनी बंगल्याच्या दरवाजावर दस्तक दिल्यावर दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलिसांच्या अंगावर घरातील कुत्री सोडल्याचा गंभीर आरोप आहे. काही वेळ वादावादी झाल्यानंतर प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, मात्र त्या दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पसार झाले, अशी माहिती समोर आली आहे.

दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर फरार
या संपूर्ण प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांच्यावर चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि आरोपीला पळवून लावणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पूजा खेडकरच्या घरी मुंबई पोलिसांनी घरावर लावलेली नोटीस फाडण्यात आलेली आहे. तर पुजाचे आई-वडील अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

खेडकरांच्या घरात जेवणाचे दोन डबे कोणासाठी पोहचले?
एकीकडे पूजा खेकडरच्या आई-वडिलांचा पोलिसांना शोध लागत नाहीये. त्यातच खेडकरांच्या घरात दोन जेवणाचे डबे पोहचले आहेत. गेट बंद असल्यानं सुरक्षा भिंतीवर डबे ठेवण्यात आले. काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्याने डबे उचलून पळ काढला. आता लपवाछपवी करणं खेडकरांसाठी नवं नाही. मात्र आज हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेलेत? पुजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना? अशी चर्चा यानिमित्ताने केली जात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें