Search
Close this search box.

काळ्या ढगांनी सूर्य झाकोळला; भरदिवसा अंधार पडला; विजांच्या कडकडाटासह राज्याच्या ‘या’ भागांमध्ये मुसळधार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा जोर धरणार असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिला होता. अगदी त्याच इशाऱ्याप्रमाणं राज्यात पावसानं पुन्हा प्रवेश केला असून बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरासह मुंबई, कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात आता विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन झालं असून त्याचा बहुतांश परिणाम, मराठवाडा, विदर्भात पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे फक्त राज्य नव्हे, तर देशातही अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासूनच पावसाचा जोरदार सुरुवात झाली विजांच्या कडकडाटामुळं शहरातील बहुतांश भागांमध्ये सोमवार, 15 सप्टेंबर 2025 रोजीसुद्धा जणू नवा दिवस उजाडलात नाही इतका काळोख पाहायला मिळाला. त्यामुळं आता परतलेला हा पाऊस आता नेमका किती दिवस मुक्कामी राहतो हाच प्रश्न नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे.

दरम्यान रविवारी (14 सप्टेंबर 2025) रात्री उशिरा हवामान विभागानं मुंबई शहर आणि उपनगरांसह पुण्यासाठीसुद्धा जोरदार पावसाचा इशारा जारी केला होता. पावसाचा जोर पाहता वाहतुकीवर याचे परिणाम होत तिचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळालं. तर, प्रशासनानंसुद्धा नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं. दरम्यान शाळांच्या सुट्टीसंदर्भातील कोणताही इशारा किंवा सूचना मात्र जारी करण्यात आल्या नसल्यानं पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाचा पुढील 24 तासांसाठी काय अंदाज?
ताशी 30 ते 40 किमी वेगाच्या वाऱ्यांसह उत्तर कोकणापासून गोव्यापर्यंत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल. यादरम्यान मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही पाहायला मिळेल असा इशारा देण्यात आला आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अशीच स्थिती असेल. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही दुर्गम भागांमध्ये पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किमी वेगानं वाहणारे वारे यांदरम्यान नागरिकांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात मुसळधार, काय आहे नेमकं चित्र?
राज्यात प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह 17 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगडच्या महाडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. असून, पावसामुळे महामार्गावरील वाहतुक काहीकाळ मंदावली होती. तर तिथं अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्याला पावसाने चांगलाच तडाखा दिलाय. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असल्यानं तर पुलावरुन प्रवास करताना वाहनं पाण्यात वाहून गेली तर, अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली.

देशभरात पावसाचं थैमान
हिमाचल, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडसह उत्तर प्रदेशातही पावसानं थैमान घातलं आहे. वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांना मोठा धक्का बसलाय. खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आलीये. पुढील आदेशापर्यंत यात्रा सुरु होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. वैष्णोदेवी यात्रा. 14 सप्टेंबर 2025, रविवारपासून सुरू होणं अपेक्षित होतं. तिथं उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये अचानक पूर आला असल्यानं रस्त्यांनादेखील नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें