Search
Close this search box.

School Holiday: 8 सप्टेंबरला शाळांनाही सुट्टी? शिक्षण उपसंचालकांनी केलं जाहीर, पण…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्य सरकारने 5 सप्टेंबरला असणारी ईद-ए-मिलादची शुक्रवारची सुट्टी रद्द केली आहे. त्याऐवजी ही सुट्टी सोमवारी 8 सप्टेंबरला दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून तसं पत्रक काढलं आहे. गणपती विसर्जनामुळे मुस्लिम समुदायाने हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने शुक्रवारऐवजी सोमवारी 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी सोमवारी सुट्टी जाहीर केली. हा निर्णय फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे.

शाळांना सुट्टी आहे की नाही?
राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालकांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. तर पालिकेच्या शिक्षण विभागाने 5 व 8 सप्टेंबर दोन्ही दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे गोंधळ वाढला आणि त्यात खासगी शाळांनी भर टाकत उपसंचालकांच्या आदेशानुसार 8 सप्टेंबरला सुट्टी दिली आहे.

उपसंचालकांचा आदेश आणि गोंधळाची स्थिती
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समुदायाने 8 ऐवजी 8 सप्टेंबरला जुलूस काढण्याचं ठरवलं. त्यानंतर राज्य सरकारने 8 सप्टेंबरला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मात्र शिक्षण उपसंचालकांनी 5 सप्टेंबर रोजी खासगी शाळा सुरु राहतील आणि 8 सप्टेंबरला बंद राहतील असा आदेश जारी केली.मात्र 5 सप्टेंबरला काही खासगी शाळांनी पूर्वनियोजित सुट्टी जाहीर केली असल्याने शिक्षक आणि पालकांमध्य संभ्रम उडाला.

दरम्यान पालिकेच्या शाळांना 8 सप्टेंबरच्या सुट्टीसाठी भरपाई वर्ग घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

राज्य सरकारने 8 सप्टेंबरला सुट्टी का जाहीर केली?
राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्ट्यांपैकी ई-ए-मिलादची सुट्टी शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दर्शवली आहे. मुस्लिमांचा धार्मिक सण ई-ए-मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
शनिवारी 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी 21 ऑगस्ट 2025 रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवारी 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार दिनांक 8 मे 1968 च्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम 1881 च्या कलम 25 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करुन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी 5 सप्टेंबर 2025 ऐवजी सोमवारी 8 सप्टेंबर 2025 हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे. आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर जिव्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवारी 5 सप्टेंबर 2025 ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.

5 सप्टेंबरची सुट्टी 8 सप्टेंबरले देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली होती. ‘ईद -ए-मिलादुन नबी’चे जुलूस 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी राज्यभर श्रीगणेश विसर्जन आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेला ‘मोहम्मद पैगंबर’ यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी जुलूस काढला जातो. या शोभायात्रेला ‘ईद -ए-मिलादुन नबी’चा जुलूस असं म्हणतात. मात्र हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी हा जुलूस काढण्याऐवजी हा जुलूस सोमवारी काढला जाणार आहे. त्यामुळेच सोमवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती.

admin
Author: admin

और पढ़ें