Search
Close this search box.

आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळणार ‘हा’ हिंदू भारतीय क्रिकेटर, गाजियाबादशी आहे खास कनेक्शन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आशिया कप 2025 ला 9 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना हा 10 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध यूएई यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना असल्याने फॅन्सची नजर ही भारतीय खेळाडूंवर राहील. मात्र यातील खास गोष्ट अशी की गाझियाबादच्या एका युवा क्रिकेटचं सिलेक्शन हे यूएईच्या संघात झालंय. एवढंच नाही तर तो 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात भारताविरुद्ध खेळण्यासाठी उतरू शकतो.

गाजियाबादमध्ये झाला आर्यंशचा जन्म :
20 वर्षीय आर्यंश शर्माचा जन्म हा गाजियाबादमध्ये झाला होता. यूएईच्या आशिया कप 2025 च्या संभाव्य संघात 2 विकेटकिपरचा समावेश झाला असून यातील एक विकेटकिपर आर्यंश शर्मा आहे. आर्यंशचा जन्म 2 डिसेंबर 2004 रोजी उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये झाला होता. तो केवळ दोन वर्षांचा असताना आपल्या कुटुंबासोबत यूएईमध्ये गेला. दुबईमध्ये शिक्षण घेत असताना त्याची क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली आणि कुटुंबाच्या मदतीने त्याने क्रिकेटमध्ये आपले करिअर घडवले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी यूएईने संघ जाहीर केला आहे. २९ ऑगस्ट पासून ही मालिका होणार असून यात यूएईने जाहीर केलेला संघ आशिया कपसाठी सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे.

आर्यांशने पहिल्यांदा 2022 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये यूएईचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या क्वालिफायर्समध्ये सुद्धा तो संघाचा भाग होता. 2023 मध्ये त्याला नेपाळमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी यूएईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाल्यावर एक मोठी संधी मिळाली. या मालिकेद्वारे यूएईने क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता फेरीत प्रवेश केला. आर्यंशला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. सोबतच तो भारताच्या विरुद्ध सामन्यात खेळताना सुद्धा दिसू शकतो. हा सामना त्याच्या करिअरमधील सर्वात खास ठरेल.

आर्यंशचं पदार्पण सामन्यात जबरदस्त शतक :
आर्यंशने 17 ऑगस्ट 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सामन्यात त्याने 43 बॉलमध्ये 60 धावा केल्या. आतापर्यंत त्याने 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 365 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकचा समावेश आहे.

तिरंगी मालिकेसाठी यूएईचा संघ :
यूएई संघ: मुहम्मद वसीम (कर्णधार), हैदर अली, राहुल चोप्रा, एथन डिसोझा, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, हर्षित कौशिक, आसिफ खान, रोहिद खान, सगीर खान, ध्रुव पराशर, अलिशान शराफू, आर्यांश शर्मा, जुनैद सिद्दिकी, मुहम्मद जोहेब.

admin
Author: admin

और पढ़ें