Search
Close this search box.

मुंबईकराची दुसरी LifeLine ठरलेल्या मेट्रोच्या तिकीट दरात वाढ? नेमकं कारण काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन ठरत असलेल्या मेट्रोच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंधेरी (प.) ते दहिसर मेट्रो 2 अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवरील प्रवास भाडे वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाडे निर्धारण समितीचे गठित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे या महिन्यात पाठविला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देताच पुढे केंद्राला ही समिती स्थापन करण्यासाठी शिफारस केली जाणार आहे.

एमएमआरडीएच्या अखत्यारितील महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) 35.1 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाते. एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवरून सद्यःस्थितीत दरदिवशी 3 लाखांहून अधिक जण प्रवास करतात. या मेट्रोच्या प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षीत त्यांच्यावरून 9 लाख प्रवासी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र प्रवासी संख्येच्या आकड्यापासून या मेट्रो अजून दूर आहे.

मेट्रोला अपेक्षित उत्पन्न मिळत नसून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच मेट्रो मार्गिकांचे भाडे एमएमआरडीएच्या मेट्रोपेक्षा अधिक आहे. परिणामी मेट्रोचा तोटा भरून काढण्यासाठी एमएमएमओसीएलकडून प्रवासी भाडेवाढीचा विचार केला जात आहे

मेट्रो 2 ए कशी आहे ही मार्गिका
मेट्रो लाईन 2ए दहिसर ते डीएन नगर हे 18.6 किमीचे अंतर असून या मेट्रो मार्गावर 17 स्थानके आहेत. मेट्रो-2A च्या 18.6 किमी प्रवासासाठी भाडे 10 रुपयांपासून सुरू होऊन 50 रुपये आहे.

मेट्रो 7 कशी असेल मार्गिका
मेट्रो लाईन 7 अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हे 16.5 किमीचे अंतर असून या मार्गावर 13 स्थानके आहेत. मेट्रो 7 च्या 16.5 किमी मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 10 रुपयांपासून सुरू होऊन 50 रुपये आहे.

admin
Author: admin

और पढ़ें