Search
Close this search box.

Amit Thackeray Meets Ashish Shelar: आशिष शेलारांची भेट घेत अमित ठाकरेंच्या विविध मागण्या; मुंबईत आज नेमकं काय घडलं?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेणार आहे. मुंबईतील वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या कार्यालयात सकाळी 9.30 वाजता अमित ठाकरेंन भेट घेतली. यावेळी गणेश उत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली. आशिष शेलार यांना एक पत्रक देऊन अमित ठाकरेंनी काही मागण्या केल्या आहेत.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह, समाजासह या सणाचा आनंद लुटणे ही त्यांची संस्कृतीशी असलेली नाळ जपण्याची जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आमची ठाम अपेक्षा आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्यभरात कुठेही गणेशोत्सव काळात परीक्षा होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही आवश्यक तेवढे तीव्र आंदोलन करू यात काही शंका नाही, असा इशाराही अमित ठाकरेंनी पत्राद्वारे दिला आहे.

अमित ठाकरेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
1) राज्यातील सर्व शाळा (SSC, CBSE, ICSE, CISCE, IB, IGCSE, MIEB, NIOS बोर्ड), सर्व महाविद्यालये (राज्य, अभिमत विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था) व सर्व शालेय/उच्च शिक्षण संचालनालय यांना आपल्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत तात्काळ आदेश जारी करण्यात यावेत की, राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत (गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी) कोणत्याही परीक्षांचे आयोजन करता कामा नये. तसेच, या कालावधीत ज्या परीक्षा निश्चित करण्यात आल्या असतील त्या तात्काळ रद्द करून पुढे ढकलण्यात याव्यात.
2) शासन धोरणाला विरोध करणाऱ्या विद्यापीठांवर व महाविद्यालयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
3) विद्यार्थ्यांना या राज्य महोत्सवात मनःपूर्वक सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

admin
Author: admin

और पढ़ें