Search
Close this search box.

कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरुबाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांना एचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले आहे.

91 वर्षीय कोकिलाबेन यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले असून त्यांना कलिना विमानतळावर पाहण्यात आले आहे. यावेळी अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे चिंतेत पाहायला मिळाले.

मुकेश अंबानीदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. मात्र अद्याप अंबानी कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसंच, हॉस्टिपलकडूनही कोणते बुलेटिन जारी करण्यात आले नाहीये. मात्र सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वाढत्या वयोमानामुळं वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. मात्र कुटुंबाकडून अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न
कोकिलोबेन अंबानी यांचे 1955 साली धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना चार मुलं असून मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर अशी त्यांच्या मुलाची नावं आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत अँटिलियामध्ये राहतात.

admin
Author: admin

और पढ़ें