मुंबईसह महाराष्ट्राला अनेक ठिकाणांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी रेड-अलर्ट देण्यात आला असून शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पावसामुळे मराठवाडा, विदर्भात शेतीचं नुकसान झालं असून, यावरुन सत्ताधारी-विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी मुंबईची लाईफ लाईन लोकल विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वे तब्बल 8 तास ठप्प होती तर पश्चिम रेल्वे धिम्यागतीने सुरु होती. तसेच सगळ्यांचे BEST च्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून शहर, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक अपडेट जाणून घ्या.
