Search
Close this search box.

मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर! Private ऑफिस कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.

खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना
तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांचंही आवाहन
“आज मुसळधार पावसाचा इशारा असल्याने आपण सर्वजण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा आहे. केवळ अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळा आणि लक्षात ठेवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आम्ही आहोत. खाजगी कंपन्यांना विनंती आहे की शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा उपलब्ध करून द्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा,” अशी पोस्ट मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये सोमवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. शाळांना सोमवारी आणि मंगळवारी आधीच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें