Search
Close this search box.

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या कार्याची केंद्रात दखल, दिल्लीतील ध्वजारोहणासाठी मस्साजोगच्या सरपंचांना पंतप्रधानांचे निमंत्रण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

घेण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) होणाऱ्या दिल्लीतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मस्साजोगच्या सरपंचांना (Massajog Sarpanch) निमंत्रण देण्यात आलं आहे. गावच्या वतीने हे निमंत्रण उपसरपंच वर्षा सोनवणे यांनी स्वीकारलं.

स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी (Independence Day 2025) विविध मान्यवरांना, सामाजिक कार्य करणाऱ्यांना निमंत्रणं दिली जातात. मस्साजोगचे दिवंगत सरपंच यांनी गावासाठी केलेल्या कामाची दखल केंद्राने घेतली. त्याचाच भाग म्हणून मस्साजोग गावातील महिला उपसरपंच वर्षा सोनवणे आणि त्यांचे पती आनंदराव सोनवणे यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास निमंत्रण दिले आहे.

पाणीदार शिवार निर्मितीच्या कामाची दखल
स्व. संतोष देशमुख हे सरपंच असताना त्यांनी मस्साजोगमध्ये पाणीदार शिवार निर्मितीचे काम हाती घेतलं. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी अभिमानाची ठरली आहे. लोक सहभागातून पाणीदार गाव करण्यासाठी हा सन्मान मस्साजोग गावाला भेटला आहे. स्वातंत्र दिनी दिल्लीतील ध्वजारोहणासाठी गावच्या सरपंचाला निमंत्रण भेटणे हा संपूर्ण गावाचा सन्मान आहे, हे श्रेय सर्व गावाचे असल्याची भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

खंडणीला विरोध केला म्हणून हत्या
बीडच्या मस्साजोगचे सरपंच यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. पवनचक्कीच्या खंडणीला विरोध केला म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्याची गँग असल्याचं उघड झालं.

वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने बीडमध्ये खंडणी आणि अवैध धंद्याचा उच्छाद मांडला होता. त्यातूनच त्याने अनेकांना त्रास दिल्याचं समोर आलं. खंडणी प्रकरणात त्याने सरपंच संतोष देशमुखांही छळ करुन हत्या केल्याचं उघडकीस आलं. वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधामुळेच धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

तर दुसरीकडे, परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचा सहभाग आहे असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीच्या तहसील परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पावणे दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी या प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत. या प्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें