भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेली पाच सामन्यांची सीरिज 2-2 अशा बरोबरीत सुटली. भारताने ५ सामन्यांच्या टेस्ट सीरिजपैकी दुसरा आणि पाचवा सामना जिंकला तर इंग्लंडने पहिला आणि तिसरा सामना जिंकला. भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट संपली असली तरी याच्याशी निगडित वाद संपण्याचं नाव घेत नाहीये. आता भारतीय स्टार गोलंदाज आकाशदीपवर (Akashdeep) बंदी लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आकाशदीपने ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटला आउट केल्यावर सेंड ऑफ दिला होता, ज्यावरून वाद निर्माण झाला.
आकाशदीपने बेन डकेटला दिला होता सेंडऑफ :
आकाश दीपने 13 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर फलंदाज बेन डकेटची विकेट घेतली. डकेट 43 धावांवर बाद झाला. डकेट रिवर्स स्कूप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. बॉल त्याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून ध्रुव जुरेलच्या जवळ पोहोचली. याविकेटमुळे बेन डकेट आणि झॅक क्रॉलीची पार्टनरशिप 100 धावांच्या आधी तुटली. यावेळी बेन डकेट मैदानातून बाहेर पडत होता. तेव्हा आकाश दीप त्याच्या जवळ गेला आणि त्याने डकेटच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचा सेंड ऑफ दिला. दोघे काहीतरी बोलत होते आणि आकाशच्या चेहऱ्यावर हसू होतं. तितक्यात मागे उभ्या असलेल्या केएल राहुलने आकाश दीपला थांबवलं आणि डकेट मैदानाबाहेर गेला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आकाशदीपवर बंदीची मागणी :
आकाशदीपच्या या सेलिब्रेशनवर बेन डकेटचा कोच जेम्स नॉटने टीका केली आहे. एवढंच नाही तर ICC ने त्याच्यावर बॅन लावण्याची सुद्धा मागणी केलीये. ICC ने सध्या आकाशदीपने केलेल्या सेलिब्रेशनवर कोणतीही ऍक्शन घेतली नाही. पण बेन डकेटच्या कोचं म्हणणं आहे की भारतीय वेगवान गोलंदाजाला याबद्दल शिक्षा मिळाली पाहिजे. बेन डकेटचा कोच जेम्स नॉटने टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना म्हटले, ‘हा एका रोमांचक टेस्ट सीरिजचा भाग होता, पण युवकांद्वारे अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आयसीसीने आकाशदीपवर दंड लावायला हवा होता’.
अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत सुटली :
टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 396 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं टार्गेट मिळालं होतं. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी करायला सुरुवात केली. पण दिवस संपल्याने सामना थांबवण्यात आला होता. ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. विजय अशक्य वाटतं असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ऑल आउट केले. त्यामुळे भारताने 6 धावांनी सामना जिंकला.
