Search
Close this search box.

महाराष्ट्राच्या सीमेवरील ‘या’ जिल्ह्यात ढगफुटी, रस्ते झाले नद्या अन् शहर झालं तलाव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उत्तरखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप पाहिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीमध्ये ढगफुटी झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटी झाल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका सौंदत्तीमधील प्रसिद्ध रेणुका मंदिराला बसला आहे. रेणुका मंदिर परिसर जलमय झालं होतं. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ढगफुटी झाल्याने रेणुका मंदिर परिसरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्याचबरोबर दर्शनासाठी आलेल्या भक्तांची मोठी तारांबळ उडाली. आज सकाळी देखील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. रेणुका देवीच्या मंदिरात देखील गुडघ्यावर पाणी साठल होतं. हे पाणी आता हळूहळू कमी होत आहे. पण सौंदत्ती मंदिर परिसरात सध्या चिखलाचा साम्राज्य पाहायला मिळत आहे. (Cloudburst in Saudatti Belgaum district on the border of Maharashtra roads turned into rivers)

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस देखील झाला आहे. रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.

याव्यतिरिक्त, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यासह इतर काही भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे स्थानिक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे आणि काही पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें