Search
Close this search box.

वैतागून जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला अन् शंभुराजेंनीच उचलला; 7/12 चं काम झटक्यातच झालं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सरकारी काम अन् 6 महिने थांब ही म्हण आपल्याला केवळ माहिती नाही, तर अनेकांनी अनुभवली देखील असेल. कारण, शासकीय काम म्हटलं की कार्यालयात हेलपाटे मारा, सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा मागे लागा असेच असते. त्यामुळे, सामान्य माणूस वैतागून जातो. सरकारी कार्यालयात कधीकधी फोनही उचलला जात नाही. मात्र, जर तुमचं काम होत नसेल अन् तुम्ही सरकारी कार्यालयातील लँडलाईवर फोन केल्यानंतर चक्क पालकमंत्रीच (Shambhuraj desai) फोन उचलत असतील तर सुखद धक्काच म्हणावा लागेल. साताऱ्यातही (Satara) अशीच घटना घडली अन् एका वकिलाचं सातबाऱ्यासंदर्भातील गेल्या अनेक दिवसांपासून पेंडिग असलेलं काम झटक्यात मार्गी लागलं.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळे प्रचलित आहेत, त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्याचा त्यांचा हातखंडा आहे. सातारा दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात असाच एक प्रत्यय आज पत्रकार परिषद सुरू असताना आला. पत्रकार परिषद सुरु असताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील लँडलाईन फोनची रिंग वाजली आणि तो वाजत असलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला. फोनवरुन बोलणारी व्यक्ती बऱ्याच दिवसापासून 7/12 दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होती. त्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांना करण्यासाठी फोन केला अन् योगायोगाने थेट पालकमंत्र्यांनीच हा फोन उचलला. त्यावेळी, जिल्हाधिकारी समजून संबंधित व्यक्तीने स्वतःची तक्रार केली, त्याचं गाऱ्हाण मांडलं. त्यांवर पालकमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न समजून घेऊन मी पालकमंत्री बोलतोय, असा सुखद धक्का संबंधित व्यक्तीला दिला. तसेच, तुमचं काम करुन देतो, म्हणत फोन ठेवला. त्यानंतर, शंभुराज देसाई यांनी प्रांतधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दिल्या.

दरम्यान, शंभुराज देसाईंच्या या तत्परतेने, योगायोगानं एका वकिलाचं अडलेलं काम मार्गी लागलं, त्यामुळे फोन करणाऱ्या व्यक्तीने शंभूराज देसाई यांचे आभार मानले. चुकून उचललेल्या फोनमुळे एकाचं काम मात्र मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची चर्चाही जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात होतेय, तर असेच इतरही लोकांची कामे व्हावीत, असाही सूर उमटत आहे.

केदारेश्वर मंदिराची नव्याने उभारणी
दरम्यान, कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान श्री केदारेश्वर मंदिराची नव्याने उभारणी केली जात आहे. याच मंदिराचा भूमिपूजन सोहळा आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या मंदिराचे पावित्र्य कायम ठेवून 12 कोटी रुपये खर्च करून हे भव्य दिव्य मंदिर दिमागदारपणे उभे करण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें