सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीवेळी तिरंगा झेंडा (Tiranga Flag) स्वीकारला गेला होता. आपल्याला तिरंगा ध्वज आणि संविधान मानलेज पाहिजे. मात्र, भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक राहिला आहे. त्यामुळे देव,देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करु, तिरंगा फडकवू. पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. ते सोमवारी नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संभाजी भिडे यांनी पुन्हा एका त्यांच्या ‘आंबा खाऊन मुलं होतात’, या वक्तव्याचा उच्चार केला. मी आंबे खाऊन मुल होतं, असे बोललो होतो. मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आजही तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. त्या वक्तव्यावरुन माझ्यावर कोर्टात खटला सुरु आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
Bhide guruji in Satara: खग्रास ग्रहणाच्या काळात मंत्राचा जप केला तर जन्मोजन्मीसाठी मंत्राची शक्ती प्राप्त होते: संभाजी भिडे
सोयराबाई यांना जे वाटतं होत ते शक्य नव्हते. सोयराबाई यांना छत्रपती संभाजी महाराजांनी राजा व्हावे, असे वाटत नव्हते. मात्र, पुढच्या काळात राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांच्यानंतर राजे झाले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात साम्य काय तर, संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या तोडीस तोड व्यक्तिमत्व होते. संभाजी महाराज यांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के हा नालायक माणूस होता, ज्याने वातनासाठी शेण खाल्ले, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
खग्रास ग्रहणाच्या काळात मनुष्याने एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याला त्या मंत्राची शक्ती जन्मोजन्मीसाठी प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गायत्री मंत्राचा जप केला होता. मंत्राचे पठण करताना ते ते अंगावरचे कपडे काढून मानेपर्यंत शीत (थंड)पाण्यात काही तास होते. त्यांच्या मृत्यूवेळी 3 एप्रिल रोजी त्यांना ताप असाह्य झाला तोंडावाटे पाणी दिलेले शरीरातून बाहेर पडत होते. शरीर पूर्ण खचले होते. शिवाजी महाराज हे उपस्थित असलेल्यांना म्हणाले की, आम्ही जातो आमचा काळ झाला. सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, हे त्यांचे शेवटचे शब्द होते, असा दावा संभाजी भिडे यांनी केला.
