Search
Close this search box.

Kolhapur News : पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी, कोल्हापुरातील स्मशानात महिलेची अघोरी पूजा, तिघांची वाट लागू दे, कागदावर ‘लाल’ नावं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी आणि त्याच्या आयुष्यातील दोन महिलांसह तिघा जणांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, या हेतूने एका महिलेने अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरात अंधश्रद्धेतून स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच पुरोगामी अशी असलेली जिल्ह्याची ओळख आता पुसट होताना दिसत आहे. नुकताच कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आला.

आपल्या पतीने ‘सोडचिठ्ठी’ देऊन वेगळं व्हावं, तसंच आणखी तीन जणांचे (त्यातील दोन महिला) आयुष्य बेचिराख व्हावं यासाठी एका महिलेने अघोरी प्रकार केला गेल्याचा संशय आहे. गावातील स्मशानभूमीत करण्यात आलेला हा अघोरी प्रकार नुसता चर्चेचा नव्हे, तर ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाची लाट निर्माण करणारा बनला आहे.

दोन दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यातील कुर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीची तयारी स्मशानभूमीत सुरु होती. काही मंडळी साफसफाईसाठी गेले असता, त्यांना बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद सापडला.

उत्सुकतेपोटी त्यांनी कागद उघडून वाचला असता, त्यावर एका महिलेचं नाव नमूद करुन “सोडचिठ्ठी द्यावी” असा मजकूर लिहिलेला होता. त्याचबरोबर आणखी तिघांची नावं लिहून “त्यांची वाट/भट्टी लागू द्या” असेही लिहिलेले होते.

अंधश्रद्धेचं भीषण रूप
या घटनेमुळे गावभर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अघोरी प्रकारांचा अवलंब करुन इतरांच्या शांत आणि सुखी आयुष्यात अडथळा आणण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही गावाच्या मुख्य रस्त्यांवर लिंबू-मिरची टाकण्याचे प्रकार दिसून आले होते. मात्र या नव्या घटनेमुळे गावात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून गावात अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती मोहीम हाती घेण्याची आवश्यकता वर्तवली जात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें